________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
८९
'ज्ञानी पुरुष' ह्या संसार जाळ्यातून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवितात, मोक्षचा मार्ग दाखवितात आणि मोक्ष मार्गावर आणतात तेव्हा आपल्याला वाटते की ह्या उपाधीतून सुटलो!
याला जीवन कसे म्हणावे? जीवन कसे सुशोभित असते! एक-एक माणसाचे सुगंध यायला हवे. आजूबाजूला ज्याची अशी कीर्ती पसरलेली असेल तर तेव्हा म्हणावे लागेल की, 'हे जे सेठजी आहेत, ना, ते किती चांगले आहेत! त्यांचे बोलणे कीती सुंदर!! त्यांचे वर्तन किती संदर! सगळीकडे दिसते का अशी कीर्ती ? लोकांचा असा सुगंध येतो?'
प्रश्नकर्ता : कधीकधी काही लोकांचे सुगंध येतात..
दादाश्री : काही काही माणसांचे, पण ते ही किती? आणि त्यात जर त्यांच्या घरी जाऊन विचारले तर त्याची दुर्गंधी कळते, बाहेर सुगंध येतो पण त्यांच्या घरी जाऊन विचारले ना तर घरचे म्हणतील, 'त्यांचे तर नांवच घेऊ नका, त्यांची गोष्टच करू नका.' अर्थात् याला सुगंध नाही म्हणत.
जीवन तर मदत (हेल्पिंग) करण्यासाठीच असले पाहिजे. ही अगरबत्ती जेव्हा जळते, तर त्यात ती स्वत:चा सुगंध स्वत: घेते का?
हा संसार जो आहे ते एक म्युजियम आहे. ह्या म्युजियममध्ये अट काय आहे ? प्रवेश करताच लिहिले आहे की, भाऊ तुला जे काही खायचे-प्यायचे आहे, काही भोग भोगायचे आहे ते आतच भोग. येथून काहीही बाहेर घेऊन जायचे नाही आणि भांडायचे नाही. कोणा सोबतही राग-द्वेष करायचा नाही. खायचे-प्यायचे सर्व काही पण राग-द्वेष नाही. करायचे, आणि हे तर आत जाऊन लग्न करतात. अरे मुर्खा, लग्न का केलेस?! बाहेर निघताना संकटात सापडशील! तेव्हा मग म्हणशील, 'मी बांधलो गेलो.' तेर कायद्याप्रमाणे आत जाऊन खायचे-प्यायचे, बायको केली तरी हरकत नाही. बायकोला सांगून द्यावे की हे संग्रहस्थान आहे, यात राग-द्वेष नाही करायचे. जोपर्यंत अनुकूल आहे तोपर्यंत फिरायचे, पण शेवटी राग-द्वेष न करताना बाहेर निघून जायचे. त्यावर द्वेष सुद्धा नाही. उद्या जर ती दुसऱ्या कोणासोबत फिरत असेल तरी त्यावर द्वेष नाही! हे संग्रहस्थान असे आहे. मग आपल्याला जितक्या युक्त्या करायच्या