________________
३०
चिंता रहायचे म्हणजे काय हिशोब लिहिता तेव्हा बिलकुल एक्युरेट त्याच्यातच चित्त ठेवले पाहिजे. कारण चित्त भविष्यकाळात पळते तर त्याने आजचे हिशोब बिघडतात. भविष्याच्या विचाराने होणाऱ्या किचकिची मूळे, आजची हिशोब वही बिघडते. चुक-भूल होते, पण जो वर्तमानात राहतो त्याची एकही चुक नाही होत, त्याला चिंता नाही होत.
चिंता, नाही डिस्चार्ज प्रश्नकर्ता : काय चिंता डिस्चार्ज आहे?
दादाश्री : चिंता डिस्चार्ज मध्ये नाही येत, कारण त्यात करणारा असतो.
जी चिंता चार्जरूपात होती, ती आता डिस्चार्जरूपात होते, त्याला आपण सफोकेशन (घुसमट) म्हणतो. कारण आत स्पर्श नाही होऊ देत ना. अहंकाराहून आत्मा वेगळा झाला ना ! एकाकार होत होता, तेव्हा ती चिंता
होती.
आता जी घुसमट होते ती पूर्वी चार्ज केलेली चिंता आहे ती डिस्चार्ज होते वेळी घुसमट होणार. जसे आत्मा वेगळा झाल्यामूळे चार्ज झालेला क्रोध होता तो डिस्चार्ज होते वेळी राग(गुस्सा) झाला. त्याच प्रकारे आत्मा वेगळा झाल्यामूळे (आत्मज्ञान प्राप्ति नंतर) जे काही होते ते वेगळेच राहते.
अर्थात् हे ज्ञान प्राप्त केल्या नंतर चिंता होणारच नाही, ते घुसमट आहे फक्त. चिंतावाले तर तोंडावरुनच कळतात. हे जे होते, ते सफोकेशन, घुसमट होते.
आपल्याला रस्ता चित्रित करून दिलेला आहे. आणि तो समजण्यात आपली चुक झाली तर आपला गोंधळ होईल, त्याला चिंता नाही म्हणत, त्याला घुसमट म्हणतात. अर्थात् चिंता नाही होणार. चिंतेत तड तड करून रक्त जळते.