________________
चिंता
चिंतेने धंद्याचे मरण प्रश्नकर्ता : धंद्याची चिंता होते. खूप अडचणी येतात.
दादाश्री : चिंता व्हायला लागली तर समजा कि कार्य अधिक बिघडणार. चिंता नाही होत तर समजा कि कार्य नाही बिघडणार. चिंता कार्याची अवरोधक आहे. चिंतेने तर धंद्याचे मरण येते. जो चढतो-ऊतरतो त्याचेच नांव धंदा. पूरण-गलन आहे. पूरण झाले त्याचे गलन झाल्या शिवाय राहणार नाही. या पूरण-गलनात आपली काही मिळकत नाही. आणि जी आपली मिळकत आहे, त्यात काही पूरण-गलन होत नाही ! असा शुद्ध व्यवहार आहे! इथे आपल्या घरात आपली बायको मुलं सगळे पार्टनर्स आहे ना?
प्रश्नकर्ता : सुख-दुःख वाटण्यावर आहे.
दादाश्री : आपण आपल्या बायको मुलांचे पालक म्हणवता. एकट्या पालकालाच चिंता का केली पाहिजे? आणि घरवाले तर उलटे सांगतात कि, आपण आमची चिंता नका करू. चिंतेने काही वाढणार आहे का?
प्रश्नकर्ता : नाही वाढत.
दादाश्री : नाही वाढत तर, मग तो चुकीचा व्यापार कोण करणार? जर चिंतेने वाढत असेल तर अवश्य करा.
त्या समजुतीने चिंता गेली.... धंदा करायला तर खूप मोठे काळीज हवे. काळीज तुटले तर धंदा ठप्प होऊन जाईल.
एक वेळा आमच्या कंपनीला घाटा झाला. आम्हाला ज्ञान होण्याआधी, तेव्हा आम्हाला सारी रात्र झोप नाही आली, चिंता वाटत होती. तेव्हा आतून उत्तर मिळाले कि, या घाट्याची चिंता आता कोण कोण करत असेल? मला वाटले कि, माझे हिस्सेदार तर कदाचित करत ही नसतील. मी एकटाच