________________
चिंता
११
आता
ज्यावर उपाय नाही त्याची चिंता का? कोणीही बुद्धिमान समजेल कि, काही उपाय नाही राहीला, म्हणून त्याची चिंता सोडून दिली पाहिजे.
ते काका रडत होते, पण मी त्यांना दोन मिनिटात त्यांचे समाधान केले. मग तर ‘दादा भगवानांचा असीम जयजयकार हो' बोलायला लागले. तर आज सकाळी पण तिथे रणछोडजीच्या मंदिरात भेटले, तेव्हा बोलले, 'दादा भगवान !' मी म्हटले, हो, तेच. मग म्हणतात, 'संपूर्ण रात्र मी तर आपलेच नांव घेत राहिलो' त्यांना जर असे फिरवले तर असे फिरतात. असे आहे.
प्रश्नकर्ता : आपण त्यांना काय सांगितले?
दादाश्री : मी सांगितले, 'ते दागिने परत येतील असे नाही, हो, पण दुसऱ्या प्रकारे दागिने येतील'.
प्रश्नकर्ता : आपण मिळालात, अर्थात् मोठा दागिनाच मिळाला ना.
दादाश्री : हो, हे तर आश्चर्य आहे. पण आता हे त्याला कशाप्रकारे समजणार? त्याला तर त्या दागिन्यांच्या समोर याची किंमतच असणार नाही ना ! अरे त्याला चहा प्यायची आहे आणि आम्ही म्हटले कि, 'मी आहे ना मग तुला चहाचे काय काम आहे?' तेव्हा तो म्हणेल, मला चहा शिवाय चैन नाही पडत, आपण आहात किंवा नाही ! त्यांना किंमत कसली? ज्याची इच्छा आहे त्याची.
निसर्गच्या पाहुण्याची साहेबी तर बघा
दुनियेत कुठलीही गोष्ट जी सर्वात किंमती असते, ती फ्री ऑफ कॉस्ट (फुकट) च असते. त्याच्या वर सरकारी कर काही ही नाही ठेवु शकत. कुठली गोष्ट किंमती आहे?
प्रश्नकर्ता : हवा, पाणी.
दादाश्री : हवा च, पाणी नाही. हवेवर सरकारी कर बिलकुल नाही