________________
चिंता
चिंता म्हणजे प्रकट अग्नी म्हणून हे सगळे समजायला हवे. असेच लावायचे औषध असेल ते पिऊन टाकले तर काय होणार? हे सगळे लावायचे औषध प्यायले आहेत. नाहीतर मनुष्याला चिंता झाली असती? हिंदुस्थानातील मनुष्याला चिंता होऊ शकेल का? आपल्याला चिंतेची हौस आहे?
प्रश्नकर्ता : नाही, शांति हवी आहे.
दादाश्री : चिंता तर अग्नी म्हटले जाते. असे होईल आणि तसे होईल. एखाद्या काळात जर कधी संस्कारी मनुष्य होण्याचे सद्भाग्य प्राप्त झाले आणि चिंतेत राहिलात, तर मनुष्यपण निघून जाईल, किती भारी जोखीम म्हणावी लागेल? जर तुम्हाला शांति हवी तर मी आपली चिंता नेहमीसाठी बंद करतो.
चिंता बंद झाली, तेव्हापासून वीतराग भगवानांचा मोक्ष म्हटला जातो. वीतराग भगवानचे जेव्हा दर्शन घेतात, तेव्हापासून चिंता बंद झाली पाहिजे. पण दर्शन ही करता नाही येत. दर्शन करायला ज्ञानी पुरूष शिकवतात कि असे दर्शन करा, तेव्हा काम होते. या चिंतेत तर आग पेटत राहते. रताळे पाहिलेत? रताळे धगधगत्या निखाऱ्यात भाजल्या सारखी स्थिती होते.
ज्ञानीच्या कृपेने चिंता मुक्ति । प्रश्नकर्ता : तर चिंता मुक्त होण्यासाठी काय केले पाहिजे?
दादाश्री : आपल्याप्रमाणेच हे भाऊ पण बऱ्याच ठिकाणी गेले, पण फायदा नाही झाला. तेव्हा त्यांनी काय केले, ते त्यांना विचारा. त्यांना एकतरी चिंता आहे? आता शिव्या दिल्या तर अशांति होणार काय, त्यांना विचारा.
प्रश्नकर्ता : पण चिंता बंद करण्यासाठी मला काय केले पाहिजे?
दादाश्री : ते तर ज्ञानी पुरूषकडे या. कृपा घेऊन जा. मग चिंता बंद होऊन जाईल, आणि संसार चालत राहिल.