________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
७५
प्रश्नकर्ता : 'डेटिंग' सुरू झाले असेल तर ते कसे बंद करावे?
दादाश्री : ते थांबवायचे. आताच नक्की करा की हे थांबवायचे आहे. आपण सांगितले की येथे तुझी फसवणूक होत आहे, तर असे फसणे लगेच थांबव. पुन्हा असे फसू नये. जेव्हा जाग आली तेव्हापासून सकाळ. जेव्हा लक्षात आले की हे चुकीचे होत आहे तर ते थांबवायला हवे.
वाइल्ड लाइफ (असंस्कृत जीवन) असू नये, इन्डियन लाइफ (सुसंकृत जीवन) असले पाहिजे.
तुम्ही निर्मळ असाल तर तुम्हाला पत्नी पण निर्मळ मिळेल. त्याचेच नांव 'व्यवस्थित', जे तंतोतंत असते.
प्रश्नकर्ता : कोणतीही मुलगी चालेल, मी कलर-वलर काही नाही मानत. जी मुलगी चांगली असेल, अमेरिकन असो किंवा इंडियन असो, त्यास माझी हरकत नाही.
दादाश्री : पण असे आहे ना, अमेरिकन आंब्यात आणि आपल्या आंब्यात फरक असतो, हे तुला माहित नाही ? काय फरक असतो आपल्या आंब्यात ?
प्रश्नकर्ता : आपले गोड असतात.
दादाश्री : हो, तर मग पहा ना. ती गोड चाखून तर पहा, आपल्या इंडियनची.
प्रश्नकर्ता : अजून चाखली नाही.
दादाश्री : नाही, पण तिच्यात फसू नकोस! अमेरिकनमध्ये फसण्यासारखे नाही. तुझ्या मम्मी आणि पप्पांना तर तू पाहिलेस ना? तर त्या दोघात कधी मतभेद होतात की नाही होत?
प्रश्नकर्ता : मतभेद तर होतच असतात.
दादाश्री : हो, तरीही त्यावेळी तुझी मम्मी घर सोडून निघून गेली का कधी?