________________
समर्पण अनादि काळापासून, आई-वडीलांचा व्यवहार; राग-द्वेषाचे बंधन आणि ममतेचा मार ! न सांगू शके, न सहन करु शके, करावे तरी काय? कोणास विचारु, कोण दाखवेल त्याचे खरे उपाय? गोंधळलेले राम, दशरथ आणि श्रेणिकरसाखे राजाही; श्रवणाच्या मृत्युवेळी किंकाळी निघाली आई-वडीलांची! लग्नानंतर विचारतो 'गुरु' पत्नीला पदोपदी; हया त्रिकोणात सुचे नाही काय करावे खरोखरी ! आजची मुले गोंधळात आई-वडीलांमुळे ; अंतर झाले मोठे, जनरेशन गॅप मुळे ! मोक्षाचे ध्येय, त्याने पार करावा संसार ; कोण बनणार सुकाणी, नाव आहे मझधार ! आतापर्यंतच्या ज्ञानीनी दर्शविले वैराग; मुल-बाळ असलेले अडकले, कसे व्हायचे वीतराग? दाखविले नाही कोणी संसारासह मोक्षमार्ग; कलियुगाचे आश्चर्य दादांनी दिले अक्रममार्ग! संसारात राहू न सुद्धा होता येते वीतराग; स्वत:हून दादांनी प्रज्वलित केले चिराग! त्या चिरागाच्या रोशनीने मोक्ष पावतात मुमुक्षु; खरे जिज्ञासु प्राप्त करतात नक्की येथे दिव्यचक्षु ! त्या रोशनीचे किरण प्रकाशित झाले ह्या ग्रंथात; आई-वडील मुलांचा व्यवहार सरळ होतो मार्गात! दिव्याने दिवा प्रज्वलित होतो प्रत्येकाच्या आत; जगास सर्मपित हा ग्रंथ, प्राप्ति करा झपाट्यात !