________________
३८
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
स्वतः रागवत नाही, तर रागवून झाल्यानंतर त्याच्या लक्षात येते की हे चुकीचे होऊन गेले, असे व्हायला नको होते, म्हणजे हे त्याच्या ताब्यात नाही. ही मशीन गरम झालेली आहे, म्हणून त्यावेळी आपण थोडे थंड रहायला पाहिजे. जेव्हा आपोआप थंड होईल तेव्हा हात लावायचा.
मुलांवर तुम्ही चिडतात ते नवीन कर्ज घेतल्यासारखे आहे, कारण की चिडण्यास हरकत नाही, पण तुम्ही 'स्वतः' चिडतात त्यास हरकत आहे.
प्रश्नकर्ता : जोपर्यंत मुलांना रागवत नाही तोपर्यंत शांत होतच नाहीत, त्यामुळे रागवावे तर लागते ना!
दादाश्री : नाही, रागावण्यास हरकत नाही परंतु 'स्वतः' रागवतात म्हणून तुमचा चेहरा बिघडून जातो, त्याची जबाबदारी आहे. तुमचा चेहरा बिघडणार नाही असे रागवा, चेहरा चांगला ठेऊन रागवा, खूप रागवा! तुमचा चेहरा बिघडतो, म्हणजे तुम्ही जे रागावतात ते तुम्ही अहंकाराने रागवत असतात.
प्रश्नकर्ता : तेव्हा तर मुलांना असे वाटेल की, हे खोटे-खोटे च रागवत आहेत!
दादाश्री : त्यांना जर एवढे कळले तरी पुष्कळ झाले. तर त्यांच्यावर परिणाम होईल, नाहीतर परिणामच होणार नाही. तुम्ही खूप रागावलात तर ते समजतात की हे कमकुवत आहेत. मुले मला सांगतात, आमचे वडील खूप कमकुवत मनुष्य आहेत, खूप चिड-चिड करतात.
प्रश्नकर्ता : असे रागवायला नको की स्वत:लाच मनात विचार येत राहतील आणि स्वत:वर त्याचे परिणाम होईल!
दादाश्री : हे तर चुकीचे आहे. रागावणे असे नाही व्हायला पाहिजे. रागवायचे वरकरणी, जसे की नाटकात भांडतो, त्याप्रमाणे असायला हवे. नाटकात भांडत असतो, 'तू असे का करतोस आणि असे तसे' सर्व बोलत असतो पण आतमध्ये काही सुद्धा होत नाही, असे रागवायचे आहे.
प्रश्नकर्ता : मुलांना सांगण्यासारखे वाटते तेव्हा रागावत असतो, तेव्हा त्यांना दुःख सुद्धा होत असेल तेव्हा काय करायचे?