SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 160
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १४६ પરિશિષ્ટ-૧ इष्टोपदेशः विक्षेप न मनिं वरुनी तत्वीं संस्थित बनून एकांती । अभियोगें त्या स्वात्मिक तत्त्वा अभ्यासणे मुने जगतीं ॥ ३६ हे आत्मतत्त्व उत्तम स्वानुभवातें जसे जसे येतें । विषय सुलभ ते असुनी कदां न जीवा तसे तसें रुचते ॥ ३७ इंद्रिय-विषय न जेवीं सुलभ असोनी न रुचति पुरुषातें । तेवीं उत्तम तत्त्वचि, रुचतें निज अनुभवास येतां तें ॥ ३८ आत्मलाभ तो इच्छी इंद्रजालसम जगास निःशेष । बघुनी, विषयांत दुज्या रमतां, मनिं खेद होइ बहु त्यास ॥ ३९ इच्छुनि अतिप्रयत्ने निर्जन एकांतवासिं तो रमतो । निजकार्यवशें किंचित् बोलुन विसरून त्यास तो जातो ॥ ४० बोलत असुनि न बोले चालत असतां कदां न तो चाले । पाहत असुनि न पाही आत्मिक तत्त्वीं स्थिरत्व मेळविलें ॥ ४१ कोण कुणाचे कैसें कवणे कोठे असेच हा राम । त्यागुनि विकल्प देहा, जाणि न निजयोगि योग विश्राम ॥ ४२ जो जेथें वसति करी, तेथें तो जीव करितसे प्रीति । रममाण जिथे होतो तेथुन कोठे न जात तो जगतीं ॥ ४३ सोडून कुठे न जाती राहि, विशेषा तदीय अनभिज्ञ । तद्विशेष अज्ञत्वें हो बद्ध न मुक्त होय परि सुज्ञ ॥ ४४ पर तें पर दुःखद हो आत्म्या आत्म्येच सौख्य मानवतें । तद् प्राप्तिस्तव उद्यम करिती म्हणुनी महान मानव ते ॥ ४५
SR No.022053
Book TitleIshtopadesh
Original Sutra AuthorN/A
AuthorPujyapadswami, Kalyanbodhisuri
PublisherJinshasan Aradhak Trust
Publication Year2010
Total Pages186
LanguageSanskrit, Gujarati
ClassificationBook_Devnagari & Book_Gujarati
File Size36 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy