________________
परिशिष्ट - १
अज्ञात कविकृत इष्टोपदेश मराठी पद्यानुवाद
१
कर्मा समूळ नाशुनि प्रगटविती जे स्वयं स्वर्भावातें । वंदन त्या हो माझे सम्यग्ज्ञान - स्वरूपिं आत्म्यातें ॥ स्वर्णजयें बनेंत हो त्या दगडांतून मानिती कनक | आत्मत्व मिळवि आत्मा होता द्रव्यादि चार तैं एक ॥ २ व्रत सुरषद - दे म्हणुनी इष्टचि परि अव्रतें मिळें नरक । छायेंत मित्र जेवीं बघत उभे वाट आतंपीं एक ॥ ३ ज्या चिंतवितां लाभे शिव, त्यातें स्वर्ग दूर किति रही । क्रोशार्द्धे खेद कसा, जो सहजचि भार कोस दों नेई ॥ ४ स्वर्गिय सुरसुख असतें निरोगि ते अक्षजन्य नाकां । बहुकाळ भोगतां येतें सुख त्यानांच योग्य लोकांत ॥ फक्त वासना असती संचारीचे जगांत सुख-दुःख । दाविति आपत्कालीं रोगासम अक्षभोग भय देख ॥ संवृत मोहे ज्ञान न जाणी द्रव्यस्वभाव, मत्त बने । द्रव्यें मद्योत्पादक पदार्थभावा तसा न नर जाणें ॥
४
६
१. मूल स्वरूपवाला, २ . उन्हांत, ३. इन्द्रियजन्य, ४. स्वर्गात, ५. वेष्टित