________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
EN
सोमसेनकृत नैवर्णिकाचा अध्याय अकरावा. पान ६१८. हुतिं वधूहस्तद्वयेन च वरेण च ॥ १३४ ॥ वरस्य वामपार्वे तु कन्याया उपवेशनम् ॥ शिला स्थाप्या तयोरग्रे मण्डले लोष्टसंयुता ॥ १३५ ॥ शिला स्थापिताः सप्त पुजा अक्षतसम्भवाः ॥ एतेषां पुरतोऽत्यर्थ दम्पत्योः स्थापनं मतम् ॥ १३६ ॥ ततो दक्षिणपादस्य योंगुष्ठो यावर जितः ॥ गृहीतव्यो वरेणैव सप्तकृत्वो मुहुर्मुदा ॥ १३७ ॥ स्थानानां परमाणां च सप्तानां गुणवत्तया ॥ सङ्कल्पेन क्रमेणैव स्प्रष्टव्याः सप्तपुंजकाः ॥ १३८ ॥ शिलायाः स्पर्शनं पश्चात्कर्तव्यं तेन यत्नतः ॥ अग्नेः
प्रदक्षिणं कर्म स्पर्शनं तृणजं पुनः ॥ १३९ ॥ पूर्णाहुतिस्ततः कार्या समन्तादुपवेशनम् || नीराजनावलोके च तथाऽऽकर्णनमाशिषः ॥ १४८ ॥
अर्थ – मग पुण्याहवाचन, पंचमंडलपूजन, नवग्रहपूजन, अघोरमंत्राने होम आणि समिधाहोम हीं कर्मे करावीत. नंतर वधूवरांच्या उभयतांच्या हातानें लाजाहोम करावा. ह्यावेळीं वधू वराच्या डाव्या बाजूस असावी. मग अग्निकुंडाच्या पुढल्या बाजूस (किंवा अग्निकुंडाच्या उत्तरेच्या बाजूस ) मंडलावर लहान दगडाने युक्त अशी मोठी शिला ( पाटा वरवंटा ) ठेवावी. त्या शिलेवर तांदळाच्या सात राशी घालाव्यात; आणि त्याच्या ( शिलेच्या) पलीकडे दंपत्याला नेऊन उभे करावें. मग अळित्यानें रंगविलेला
223
For Private And Personal Use Only