________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अन्याय दहावा. पान १२२. gawraveencameraoewwecacaveeeeeeeeeeeeeeeeeeeeeees हलेला नाही आणि जो ज्ञान, ध्यान आणि तपश्चर्या ह्यांत नेहमी गढून राहिला आहे तोच स्तुत्य है १ तपस्वी होय.
सम्यग्दृष्टीचे लक्षण. एतेषां निश्चयो यस्य निःशङ्कत्वेन वर्तते ॥
सम्यग्दृष्टिः स विज्ञेयः शङ्काद्यष्टकवर्जितः ॥ १९ ॥ अर्थः-देव, शास्त्र आणि तपस्वी ह्यांच्याविषयीं ज्याचा निःशंक असा निश्चय झाला आहे आणि ज्याला शंका वगैरे आठ दोष नाहीत तो सम्यग्दृष्टि समजावा. आता सम्यक्त्वाची अंगें सांगतात.
निःशंकितांग. देवे मन्त्रे गुरौ शास्त्रे कचिदतिशयो न चेत् ॥
फल्गुदोषान्न कर्तव्यः संशयः शुध्ददृष्टिभिः॥ २०॥ , अर्थः- आपला देव, आगमात सांगितलेले मंत्र, आपला गुरु आणि आपले शास्त्र यांच्याविषयी तुच्छ दोष मनांत आणून सम्बग्दृष्टीने संशय घेऊ नये. कारण, परमतांत सांगितलेले देव, मंत्र, गुरु आणि शास्त्र ह्यांत तरी दृष्टिगोचर होण्यासारखें अधिक माहात्म्य आहे कोठे? मुळीच नाही.
निष्कांक्षितांग.
RABABASUBA
For Private And Personal Use Only