________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सातवा.
NNNN
पान ३९५.
अल्पलाभेन कर्तव्यं वस्त्रस्य विक्रयं मुदा ॥ ११३ ॥
अर्थ- गज नांवाचें वस्त्रे मोजण्याचें साधन व ताजवा हे अगदीं बरोबर असावेत. त्यांत कमी जास्ती अगदीं करूं नये. आणि वस्त्रे मात्र थोडासा नफा घेऊन संतोषानें विकावीत. वर्षाकालांतील व्यवहार.
वर्षासु सूक्ष्मवस्त्रेषु जन्तूनां सम्भवो भवेत् ॥ तत्प्रतिलेखनं कार्ये श्रावकैर्धर्महेतवे ॥ ११४ ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अर्थ - पर्जन्यकालांत वारीक कापडांत जीवजंतू होण्याचा संभव असतो, झणून श्रावकांनीं तीं व वरचेवर झाडून ठेवावीत. ह्मणजे जीवहिंसा न होऊन धर्मरक्षण होईल.
विकत न घेण्याच्या वस्तु.
रोमचर्मभवं वस्त्रं कौशीसं (?) रक्तवर्जितम् ॥
नीचगृहारनालेन संलिप्तं नैव विक्रयेत् ॥ ११५ ॥
अर्थ - लोकरीचें वस्त्र, चामडीचें वस्त्र, न रंगविलेलें रेशमी वस्त्र आणि नीच मनुष्याच्या घरांतील कांजीची खळ ज्याला लाविली आहे असें वस्त्र हीं वस्त्रे वैश्यानें विकू नयेत.
व्यापाराकरितां घेण्याच्या वस्तु.
For Private And Personal Use Only