________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ३९४.
No
दधि दुग्धं घृतं तक्रं भव्यपात्राय दीयते ॥ ११० ॥ घृतस्य विक्रये दोषो नास्ति व्यापारवर्तिनः ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
शेषं गव्यं न विक्रीत तृणाद्यैस्तर्पयेद्धनम् ॥ १११ ॥
अर्थ -- गायी, मशी, घोडे वगैरे जनावरांचा संग्रह करून त्यांचा विक्रमही करावा. दही, दूध, तूप आणि ताक हे पदार्थ भव्यपात्राला दान करावेत. व्यापार करणाऱ्या वैश्यानें तूप विकले असतां कांहीं दोष नाहीं. बाकीचे पदार्थ मात्र विकू नयेत. आणि आपल्या गायी वगैरे जनावरांचें गवत वगैरेंच्या योगानें पोषण करावे. हें वैश्याचे पशुपालन कर्म सांगितले. पुढे वाणिज्य ( व्यापार ) कर्म सांगतात. वाणिज्याचे तीन प्रकार.
वाणिज्यं त्रिविधं प्रोक्तं पण्यं वृषभवाहनम् ॥
अधिनावादिकं चेति कुटुम्बपोषणाय वै ॥ ११२ ॥
अर्थ वाणिज्य तीन प्रकारचें आहे. दुकान घालणे, बैलावरून माल परगावी नेणे आणि समुद्रांतून नौकेतून माल नेणें हें तीनही प्रकारचें वाणिज्य वैश्यानें आपल्या कुटुंबाच्या पोषणाकरितां करावें.
मोजमाप व ताजवा ह्यांत कमीज्यास्त नसणें.
गजयन्त्रे समानत्वं न्यूनाधिक्यविवर्जितम् ॥
For Private And Personal Use Only