________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
eeeeeeeservew
सोमसेनकृत बैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३३३. Meedeveeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee
भोजनास बसण्याचा विधि. पात्रं धृत्वा तु हस्तेन यावद्ग्रासं न भुज्यते ॥
अन्नं प्रोक्ष्यामृतीकृत्य सेचयेदिमलैजलैः॥ १७५॥ अर्थ-ग्रास तोंडांत घालण्याच्या पूर्वी एका हाताने पात्र धरावें, व प्रथम अन्नावर प्रोक्षण करून पुढे । सांगितलेल्या मंत्राने अमृतीकरण करावें. आणि अन्नाच्या भोवत्याने पाणी फिरवावें.
ॐ हीं झं वं दः पः हः इदममृतान्नं भवतु स्वाहा ॥ अत्र प्रोक्षणम् ॥ अर्थ- ॐ हीं झं इत्यादि मंत्राने अन्नाचें अमृतीकरण करावें. ह्या वेळी अन्नावर पाण्याने मोक्षण करावें.
ॐ हीं झौं झौं भूतप्रेतादिपरिहारार्थ परिषेचयामि स्वाहा ॥ परिषेचनम् ॥ अर्थ-- “ॐ हीं झौं" इत्यादि मंत्राने अन्न वाढलेल्या पात्राच्या भोवत्याने पाणी फिरवावें.
अन्नेनैव घृताक्तेन नमस्कारेण वै भुवि ॥ तिम्र एवाहुतीर्दद्याद्भोजनादौ तु दक्षिणे ॥ १७६ ।। बलिं दत्वोर्विदेवेभ्यः करौ प्रक्षाल्य वारिभिः॥
अमलीफलमात्रं तु गृह्णीयाद्ग्रासमुत्तमम् ।। १७७।। अर्थ- भोजनास आरंभ करण्याच्या पूर्वी तूप लाविलेल्या भाताने भूमीवर ( उर्विदेवेभ्यो नमः) या
For Private And Personal Use Only