________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान २००.
ea
कुर्याच्छेषं विधानं तु संक्षेपादग्निहोमवत् ॥ ७४ ॥
अर्थ- आतां वालुकाहोम सांगतात- गायीच्या शेणानें जमीन सारवून त्याच्यावर गंधोदकाचें सेंचन करावें. मग नदीतील वाळू त्यावर एक हात लांबरुंद पसरावी. त्याच्यावर पिंपळाचीं लांकडे अथवा दुसरीं लांकडें पूर्वी होमकुंडांत रचल्याप्रमाणें शिखराच्या आकाराचीं रचावीत. मग नवग्रह, तिथिदेवता, दिक्पाल आणि बाकीच्या देवता ह्यांचं पूजन करून, तीं लांकडें पेटवून अग्निनायकाचें पूजन करावें. अग्निहोमाप्रमाणेंच आचमन, तर्पण, जप, समिधांनीं पूर्वी करावयाचा होम, वगैरे सर्व विधि संक्षेपाने करावा.
होमाचे प्रसंग. व्रतबन्धे विवाहे वा सुतके पातके तथा ॥ जिनगेहप्रतिष्ठायां नूतनगृहनिर्मितौ ॥ ७५ ॥ ग्रहपीडादिके जाते महारोगोपशान्तिके ॥ गर्भाधानविधाने तु पित्रादिमरणे तथा ॥ ७६ ॥ कुण्डानां लक्षणं प्रोक्तं प्रागेव होमलक्षणे ॥ यथावसरमालोक्य कुर्यादोमविधिं बुधः ॥ ७७ ॥
NNNN
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only