________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
५०६ नाकालतो म्रियते जायते वा
नाकालतो व्याहरते च बालः । नाकालतो यौवनमभ्युपैति
नाकालतो रोहति बीजमुप्तम् ॥ १२।२५।११ वेळ आल्याशिवाय कोणी मरत नाही किंवा जन्माला येत नाही. योग्य काळ आल्यावांचून लहान मूल बोलूं लागत नाही. योग्य काळाशिवाय कोणास तारुण्यावस्था प्राप्त होत नाही. आणि पेरललेले बी अकाली उगवत नाही. ५०७ नाकृतात्मा वेदयति धर्माधर्मविनिश्चयम् ॥ ३२१५।१८
मनोनिग्रह केल्याशिवाय धर्म कोणता, अधर्म कोणता याचे निश्चित ज्ञान होत नाही. ५०८ नाकृत्वा लभते कश्चित् किंचिदत्र प्रियाप्रियम् १२।२९८१३०
काही तरी केल्याशिवाय या लोकी कोणालाहि काही सुखदुःख प्राप्त होत नाही. ५०९ नागामिनमनर्थ हि प्रतिघातशतैरपि ।
शक्नुवन्ति प्रतिव्योहुमृते बुद्धिबलानराः ॥१२।२२७१३२ शेकडों प्रकारचे उपाय केले तरी मनुष्यांना बुद्धिसामर्थ्य असल्यावांचून भावी अनर्थाचा प्रतिकार करितां येणे शक्य नाही. ५१० नामतः कीर्तिरस्तीह न वित्तं न पुनः प्रजाः ।
इन्द्रो वृत्रवधेनैव महेन्द्रः समपद्यत ॥ १२।१५।१५ शत्रचा वध न करणाऱ्या राजाला या लोकी कीर्ति लाभणार नाहीं, धन मिळणार नाही आणि त्याची प्रजाहि सुरक्षित राहणार नाही. इंद्र सुद्धां वृत्रासुराचा वध करूनच महेंद्रपदवीला पोचला. ५११ नाच्छित्वा परममाणि नाकृत्वा कर्म दारुणम् ।
नाहत्वा मत्स्यघातीव प्राप्नोति महतीं श्रियम् १२११४०५० शत्रूच्या मर्मस्थानांवर घाव घातल्याशिवाय, भयंकर पराक्रम गाजविल्याशिवाय, आणि मासे मारणाऱ्या कोळ्याप्रमाणे हत्त्या केल्याशिवाय मोठ्या लक्ष्मीचा ( राजलक्ष्मीचा ) लाभ होणार नाही.
म. भा.६
For Private And Personal Use Only