________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
(६) वरीच उपयोगी पडतील. तसेंच संस्कृत भाषेची अभिरुचि असणाऱ्या सामान्य वाचकांनाही या वचनांचा उपयोग होईल. ___ या पुस्तकांतील वचने महाभारताच्या मुंबईप्रतीतून घेतली आहेत. वचनें वर्णक्रमाने दिली असून शेवटीं मुख्य विषयांची सूची जोडिली आहे. वचनांच्या डावीकडे क्रमांक घातले आहेत आणि उजवीकडे स्थलनिर्देश केला आहे. स्थलनिर्देशांतील डावीकडून पहिला अंक पर्वाचा, दुसरा अध्यायाचा व तिसरा श्लोकाचा समजावा. ज्या वचनांत जो विषय आला, त्या वचनाचा क्रमांक त्या विषयापुढे मूचीमध्ये घातला आहे. सूचीमध्ये एकाच अर्थी आलेले अनेक शब्द त्या त्या ठिकाणी दिले असून पर्याय शब्द कंसांत घातले आहेत.
श्रीमहाभारतातील ओजस्वी वचनांचा परिचय सर्वांना सुलभतेने होण्याला हे पुस्तक उपयोगी पडो, अशी भगवान् श्रीकृष्णपरमात्म्याजवळ प्रार्थना करून प्रस्तावना संपवितो.
भीष्माष्टमी, शके १८५० र विष्णु विनायक परांजपे
S राहणार पेण, जिल्हा कुलाबा
For Private And Personal Use Only