________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ।
vvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvv.
n
wr.
४१२ धर्मार्थकामाः समसेव सेव्या
यो ह्येकभक्तः स नरो जघन्यः । तयोस्तु दाक्ष्यं प्रवदन्ति मध्यं
स उत्तमो योऽभिरतस्त्रिवर्गे ॥१२॥१६७१४० धर्म, अर्थ आणि काम यांचे सेवन सारख्याच प्रमाणाने केले पाहिजे. यांपैकी कोणत्याहि एकावरच जो भर देतो तो मनुष्य निकृष्ट होय. यांतून दोहोंच्या ठिकाणी दक्ष असणारा मध्यम प्रतीचा होय. सर्वांत श्रेष्ठ तोच की, जो या तीनहि पुरुषार्थामध्ये रममाण होऊन राहतो. ४१३ धर्मार्थों धर्मकामौ च कामार्थों चाप्यपीडयन् ।
धर्मार्थकामान्योऽभ्यति सोऽत्यन्तं सुखमश्नुते ।।९।६०२२ धर्म व अर्थ, धर्म व काम, काम व अर्थ यांचा एकमेकांशी विरोध येऊ न देतां धर्म, अर्थ व काम या तिहींचें जो सेवन करतो त्याला आत्यंतिक सुख प्राप्त होते. ४१४ धर्मे चार्थे च कामे च मोक्षे च भरतर्षभ ।
यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत्कचित् ॥१॥६२।५३ (वैशंपायन जनमेजय राजाला सांगतात ) धर्माविषयीं, कामाविषयी आणि मोक्षाविषयीं यांत ( महाभारतांत ) जें सांगितले आहे तेच इतर ग्रंथांत आहे. जे यांत नाही ते कुठेच नाही. ४१५ धर्मेण राज्यं विन्देत धर्मेण परिपालयेत ।।
धर्ममूलां श्रियं प्राप्य न जहाति न हीयते ॥ ५॥३४॥३१ धर्माने राज्य मिळवावें व धर्मानेंच त्याचे संरक्षण करावें. धर्माने मिळविलेल्या राजलक्ष्मीचा त्याग करण्याचा प्रसंग येत नाहीं; व तीहि राजाला सोडून जात नाही. ४१६ धर्मे तिष्ठन्ति भूतानि धर्मे राजनि तिष्ठति ।
तं राजा साधु यः शास्ति स राजा पृथिवीपतिः।।१२।९०५ धर्माच्या आधाराने प्राणी राहतात, धर्म, राजाच्या आधाराने राहतो, त्या धर्माचे पालन जो राजा उत्तम प्रकारे करतो तो राजा सर्व पृथ्वीचा राजा होतो.
For Private And Personal Use Only