________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३८१ द्रव्यागमो नृणां सूक्ष्मः पात्रे दानं ततः परम् । .
कालः परतरो दानाच्छ्रद्धा चैव ततः परा॥१४१९०९४ द्रव्य संपादन करणे ही गोष्ट कमी महत्त्वाची आहे. सत्पात्री केलेल्या दानाची योग्यता त्याहून जास्त आहे. योग्य काळी दान करणे हे त्यापेक्षांहि श्रेष्ठ. आणि श्रद्धा ही तर त्याहिपेक्षा श्रेष्ठ आहे. ३८२ द्रोहाद्देवैरवाप्तानि दिवि स्थानानि सवशः॥१२।८।२८
द्रोहाच्याच योगानें देवांनी स्वर्गातील सर्व स्थाने संपादन केली. ३८३ द्वावम्भसि निवेष्टव्यौ गले बद्धा दृढ शिलाम् ।
धनवन्तमदातारं दरिद्रं चातपस्विनम् ॥ ५॥३३॥६० धनवान् असून दान न करणारा आणि दरिद्री असून तपश्चर्या न करणारा या दोघांना गळ्यांत मोठी धोंड बांधून पाण्यात बुडवून टाकावें. ३८४ द्वाविमो कण्टको तीक्ष्णौ शरीरपरिशोषिणौ ।
यश्चाधनः कामयते यश्च कुप्यत्यनीश्वरः॥ ५।३३।५६ निर्धन असून चैनीची इच्छा करणे व अंगांत सामर्थ्य नसतां रागावणे हे दोन शरीरातील रक्त अगदी नाहीसे करून टाकणारे तीक्ष्ण कांटे होत. ३८५ द्वे कर्मणी नरः कुर्वन्नस्मिँल्लोके विरोचते।
अब्रुवन्परुषं किंचिदसतोऽनचेयस्तथा ॥ ५।३३।५४ दोन गोष्टी करणारा मनुष्य या लोकी योग्यतेस चढतो. यत्किंचितहि कठोर न बोलणे आणि दुर्जनांचा गौरव न करणे. ३८६ द्वेष्यो न साधुभवति न मेधावी न पण्डितः ।
प्रिये शुभानि कार्याणि द्वेष्ये पापानि चैव ह॥ ५।३९।४ जो ज्याच्या द्वेषास पात्र झालेला असतो तो त्याला सज्जन, बुद्धिमान् अथवा शहाणा वाटत नाही. कारण, प्रिय असलेल्या मनुष्याची कृत्ये सर्व काही चांगलीं, आणि द्वेषास पात्र झालेल्या मनुष्याची कृत्ये सर्व काही वाईट [ समजणे ही सामान्य लोकांची रीतच आहे.]
For Private And Personal Use Only