________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
२६६ किं तैर्येऽनडुहो नोह्याः किं धेन्वा वाप्यदुग्धया ।
वन्ध्ययाभार्ययाकोऽर्थः कोऽर्थो राज्ञाप्यरक्षता॥१२७८४१ जे वाहून नेण्याच्या कामी येत नाहीत त्या बैलांचा काय उपयोग ? दूध न देणारी गाय काय कामाची ? वांझ स्त्री काय करावयाची ? तसेंच, रक्षण न करणारा राजा हवा कशाला? २६७ किं नु मे स्यादिदं कृत्वा किं नु मे स्यादकुर्वतः।
इति कर्माणि संचिन्त्य कुर्यादा पुरुषो न वा ॥५॥३४।१९ हे केल्याने माझा काय फायदा होईल, न केल्याने काय तोटा होईल, असा विचार करून मग कोणतेंहि कार्य मनुष्याने करावे अथवा करूं नये. २६८ कीर्तिरक्षणमातिष्ठ कीर्तिर्हि परमं बलम् ।
नष्टकीर्तेर्मनुष्यस्य जीवितं ह्यफलं स्मृतम् ॥ १।२०३।१० कीर्ति राखण्याकरितां झटून प्रयत्न कर. कारण, कीर्ति हे श्रेष्ठ प्रकारचे बल आहे. ज्याची कीर्ति नष्ट झाली त्या मनुष्याचे जिणें व्यर्थ गेले. २६९ कीर्तिर्हि पुरुषं लोके संजीवयति मातृवत् ।
अकीर्तिर्जीवितं हन्ति जीवतोऽपि शरीरिणः ॥३३००।३२ कीर्ति ही मातेप्रमाणे मनुष्याला जगांत खरेखुरे जीवन प्राप्त करून देते. अपकीर्ति जिवंत असलेल्या प्राण्याच्याहि जीविताचा नाश करिते. २७० कुतः कृतघ्नस्य यशः कुतः स्थानं कुतः सुखम् ।
अश्रद्धेयः कृतघ्नो हि कृतघ्ने नास्ति निष्कृतिः॥१२।१७३।२० कृतघ्न मनुष्याला यश कोठून येणार ? अधिकार कोठचा ? आणि सुख तरी कोठचें ? [ अर्थात् त्याला यांपैकी काहींच मिळत नाही ]. कारण, कृतघ्न हा अविश्वसनीय बनलेला असतो. कृतघ्नाला प्रायश्चित्त नाही. २७१ कुर्यात्कृष्णगतिः शेषं ज्वलितोऽनिलसारथिः । __न तु राजाभिपन्नस्य शेषं कचन विद्यते ॥ १२॥६८१५० वारा ज्याचा सहकारी आहे असा प्रज्वलित झालेला अग्नि एक वेळ दग्ध केलेल्या वस्तूंतील काही शेष ठेवील. परंतु राजाने ज्याच्यावर हल्ला केला त्याचे काहीएक शिल्लक राहणार नाही.
For Private And Personal Use Only