________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
४२ सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि २५१ कालः पचति भूतानि सर्वाण्येवात्मनात्मनि ।
यस्मितु पच्यते कालस्तं वेदेह न कश्चन ॥१२॥२३९।२५ काळ स्वतः सर्व प्राण्यांना आपल्या पचनी पाडतो, परंतु काळाला जो पचनी पाडतो त्या परमात्म्याला कोणीच जाणत नाही. २५२ कालमूलमिदं सर्व भावाभावौ सुखासुखे ॥ १।१।२४७
जन्म आणि मृत्यु, सुख आणि दुःख ही सर्व काळावर अवलंबून आहेत. २५३ काले काले तु संप्राप्ते मृदुस्तीक्ष्णोऽपि वा भवेत् ॥३।२८।२४
जसजशी वेळ येईल त्याप्रमाणे सौम्य किंवा कठोर वृत्तीने वागावें. २५४ कालेन पादं लभते तथार्थ
ततश्च पादं गुरुयोगतश्च । उत्साहयोगेन च पादमृच्छेत्
शास्त्रेण पादं च ततोऽभियाति ॥ ५।४४१६ प्रथमतः गुरूंपासून चतुर्थांश विद्या प्राप्त होते; नंतर आपल्या बुद्धिवैभवानें चतुर्थाश; कालांतराने विचारपरिपक्कतेमुळे चतुर्थाश; आणि आपल्याबरोबरच्या लोकांशी चर्चा केल्याचे योगाने (विचारविनिमयाने ) चतुर्थांश विद्या प्राप्त होते. (या श्लोकांत पाठक्रमाहून अर्थक्रम भिन्न आहे असें टीकाकारांनी म्हटले आहे त्याला अनुसरून वरील अर्थ दिला आहे.) २५५ कालेन रिपुणा संधिः काले मित्रेण विग्रहः।
कार्य इत्येव संधिज्ञाःपाहुर्नित्यं नराधिप।१२।१३८।२०८ (भीष्म युधिष्ठिराला म्हणतात.) हे राजा, प्रसंगानुसार शत्रूशीहि संधि करावा, व मित्राशींहि विरोध करावा, असेंच संधिवेत्ते लोक सदैव सांगत असतात. २५६ कालेनाभ्याहताः सर्वे कालो हि बलवत्तरः॥१२।२२७५६ काळाने सर्वांना मारून टाकले आहे. काळ सर्वांना पुरून उरला आहे.
For Private And Personal Use Only