SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 45
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि २०४ एकं विषरसो हन्ति शस्त्रेणैकश्च वध्यते । ___ सराष्ट्र सप्रजं हन्ति राजानं मन्त्रविप्लवः ।।५।३३।४५ _ विष एकालाच ठार मारतें आणि शस्त्रानेसुद्धां एकाचाच घात होतो. परंतु राजाच्या गुप्त मसलतीत काही बिघाड झाला, तर तो सर्व प्रजेसह राजाच्या नाशाला कारणीभूत होतो. २०५ एकं हन्यान्न वा हन्यादिषुर्मुक्तो धनुष्मता । बुद्धिबुद्धिमतोत्सृष्टा हन्याद्राष्ट्र सराजकम् ॥ ५॥३३॥४३ तिरंदाजाने सोडलेला तीर जेमतेम एका प्राण्याचा वध करील न करील. परंतु बुद्धिमान् पुरुषाने योजलेली युक्ति राजासह सर्व राष्ट्राचा घात करील. २०६ एकः क्रुद्धो ब्राह्मणो हन्ति राष्ट्रम् ॥ ५।४०८ क्रुद्ध झालेला एक ब्राह्मण सर्व राष्ट्राचा नाश करूं शकेल. २०७ एकः क्षमावतां दोषो द्वितीयो नोपपद्यते । यदेनं क्षमया युक्तमशक्तं मन्यते जनः ॥ ५॥३३॥४८ क्षमाशील पुरुषांच्या ठायीं एकच दोष आढळतो, दुसरा नाही. तो दोष एवढाच की, त्याच्या सहनशीलतेमुळे लोक त्याला दुर्बल समजतात. २०८ एकः पापानि कुरुते फलं भुङ्क्ते महाजनः । भोक्तारो विप्रमुच्यन्ते को दोषेण लिप्यते ॥ ५॥३३॥४२ एकजण पाप करतो व त्याचे फळ पुष्कळ लोकांना भोगावे लागते. परंतु हे भोगणारे अजीबात सुटून जातात आणि कर्त्याला मात्र पापाचा दोष लागतो. २०९ एकत्र चिरवासो हि न प्रीतिजननो भवेत् ॥ ३॥३६३६ एकाच ठिकाणी फार दिवस राहणें सुखावह होत नाही. २१० एकमेव हि लोकेऽस्मिन्नात्मनो गुणवत्तरम् । इच्छन्ति पुरुषाः पुत्रं लोके नान्यं कथंचन ॥ ७१९४१५ या जगांत एक पुत्रच तेवढा आपल्यापेक्षा अधिक गुणवान् व्हावा, असें लोक इच्छीत असतात; दुसरा कोणीहि असा वरचढ होण्याची इच्छा करीत नाहीत. ... For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy