________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
४३ तावजितेन्द्रियो न स्याद्विजितान्येन्द्रियः पुमान् ।
न जयेद्रसनं यावजितं सर्व जिते रसे ॥ ११।८।२१ इतर इंद्रिये जिंकणाऱ्या पुरुषाने जोपर्यंत रसनेंद्रिय जिंकिलें नाही, तोपर्यंत तो जितेंद्रियच नव्हे. रसनेंद्रिय जिंकिलें असतां त्याने सर्व इंद्रियें जिंकिल्यासारखी आहेत. ४४ तावत्प्रमोदते स्वर्गे यावत्पुण्यं समाप्यते ।
क्षीणपुण्यः पतत्यागनिच्छन्कालचालितः॥११।१०।२६ प्राणी स्वर्गामध्ये पुण्य संपेपर्यंत विषयांचा उपभोग घेत असतां आनंद पावतो, परंतु पुण्य संपतांच तेथून पडण्याची इच्छा करीत नसतांही, कालाने त्यास पाडिले म्हणजे तो खाली पडतो. ४५ दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभङ्गुरः ।
तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुण्ठप्रियदर्शनम् ॥ ११।२।२९ (निमिराजा, कवि हरि इत्यादि नऊ योगेश्वरांना म्हणाला.) क्षणभंगुर असलेलाही हा मनुष्यदेह जीना दुर्लभ आहे; आणि त्या मनुष्यजन्मामध्येही भगवद्भक्तांचे दर्शन दुर्लभ आहे असें मी मानितों. ४६ दुष्करः को नु साधूनां दुस्त्यजो वा महात्मनाम् ९।५।१५ महात्म्या साधूंना करण्यास अथवा टाकण्यास कठीण असें काय आहे ? कांहींच नाही. ४७ दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं पिबेजलम् ।
सत्यपूतां वदेद्वाचं मनःपूतं समाचरेत् ॥ १।१८।१६ दृष्टीने पाहून शुद्ध ठरलेल्या जागी पाऊल टाकावें, वस्त्राने गाळलेले पाणी प्यावें, सत्याने पवित्र अशी वाणी उच्चारावी आणि मनाने विचार करून शुद्ध असेल तेंच आचरण करावें.
For Private And Personal Use Only