________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
१ अचक्षुरन्धस्य यथाग्रणीः कृतः स्क. अ. श्लो.
तथा जनस्याविदुषोऽबुधो गुरुः ॥ ८ । २४ । ५० ज्याप्रमाणे आंधळ्या मनुष्याने आंधळा मनुष्य आपला पुढारी केला असतां त्यापासून कांहींएक उपयोग होत नाही, त्याप्रमाणे ज्ञान नसलेल्या लोकांनी अडाणी गुरु केला असता त्याचा काहीएक उपयोग होत नाही. २ अज्ञानादथवा ज्ञानादुत्तमश्लोकनाम यत् ।
संकीर्तितमचं पुंसो दहेदेधो यथानलः ॥ ६।२।१८ ज्याप्रमाणे जाणूनबुझून टाकिलेला किंवा नकळत पडलेला अग्नि काठे जाळून टाकितो, त्याप्रमाणे पवित्र कीर्ति असलेल्या परमेश्वराचें नांव समजून उच्चारिले किंवा त्याचा सहज उच्चार झाला, तरी ते नांव मनुष्याचे पातक नाहीसे करून टाकितें. ३ अणुभ्यश्च महद्भयश्च
शास्त्रेभ्यः कुशलो नरः । सर्वतः सारमादद्यात्
पुष्पेभ्य इव षट्पदः॥११।८।१० ज्याप्रमाणे भ्रमर लहानमोठ्या फुलांतील रस ग्रहण करतो, त्याप्रमाणे विवेकी मनुष्याने लहानमोठ्या सर्व शास्त्रांतील महत्त्वाचा भाग ग्रहण करावा.
For Private And Personal Use Only