________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
३२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१८५ उच्चैवत्तेः श्रियो हानिर्यथैव मरणं तथा ॥१२॥१३३१५
उच्च वृत्तीने राहणाऱ्या मनुष्याला संपत्तीचा नाश मरणासारखाच होय. १८६ उत्थानवीरः पुरुषो वाग्वीरानधितिष्ठति ॥ १२।५८।१५
कर्तृत्ववान् पुरुष वाचाळ पुरुषांवर छाप ठेवतो. १८७ उत्थानहीनो राजा हि बुद्धिमानपि नित्यशः।
प्रधर्षणीयः शत्रूणां भुजङ्ग इव निर्विषः॥ १२॥५८।१६ राजा बुद्धिमान् असला तरी दुसऱ्यांवर चढाई न करील तर, विषहीन सर्पाप्रमाणे, नेहमीं शत्रूच्या हल्ल्यांना पात्र होतो. १८८ उत्थानेनामृतं लब्धमुत्थानेनासुरा हताः ।
उत्थानेन महेन्द्रेण श्रेष्ठयं प्राप्तं दिवीह च ॥ १२॥५८।१४ [ देवांनासुद्धां ] प्रयत्नानेच अमृताची प्राप्ति झाली, व प्रयत्नानेच दैत्यांचा संहार करितां आला. इंद्रदेखील प्रयत्नानेंच इहपरलोकी श्रेष्ठपणा मिळविता झाला. १८९ उत्थायोत्थाय गच्छेत नित्ययुक्तो रिपोहान् ।
__कुशलं चास्य पृच्छेत यद्यप्यकुशलं भवेत्॥१२।१४०।२२ नेहमी सावध राहून दररोज उठून शत्रूच्या घरी जावे आणि तो जरी खुशाल नसला तरी त्याला कुशलप्रश्न विचारावे. १९० उत्पन्नस्य रुरोः शृङ्गं वर्धमानस्य वर्धते ।
प्रार्थना पुरुषस्येव तस्य मात्रा न विद्यते ॥ १३॥९३।४५ उपजलेलें हरिणाचे पोर वाढू लागले की त्याच्याबरोबर त्यांची शिंगेंही वाढत जातात. तद्वत् मनुष्याची हांव तो वाढू लागला की वाढू लागते. मग तिला काही मर्यादा रहात नाही. १९१ उत्साहश्चापि यत्नेन कर्तव्यो भूतिमिच्छता॥१॥१४०८५
वैभवाची इच्छा करणाऱ्याने उत्साहाने उद्योग केला पाहिजे. १९२ उदाराणां तु सत्कर्म दैवं क्लीवा उपासते ॥१२॥१३९।८२
श्रेष्ठ प्रकारचे लोक सत्कर्माची कास धरतात. दुबळे लोक दैवावर हवाला ठेवतात.
For Private And Personal Use Only