________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ४४१ शैशवं वार्धकं ज्ञेयं तिर्यक्त्वं मृतिरेव च ।
तारुण्यमेव जीवस्य जीवितं तद्विवेकि चेत् ॥७१६२।२१ बाळपण आणि म्हातारपण या दोन्ही अवस्थांत ज्ञान प्राप्त होत नसल्यामुळे त्या पशुपक्ष्यांप्रमाणे व्यर्थ होत. त्या मरणतुल्यच आहेत. प्राण्याचे खरें जीवित म्हणजे तारुण्य होय. परंतु ते देखील विचार करणारे असेल तर. ४४२ शैशवं च मनश्चैव सर्वास्वेव हि वृत्तिषु ।
भ्रातराविव लक्ष्यते सततं भङ्गुरस्थिती ॥ १।१९।१६ बाळपण आणि मन या दोहोंचे स्वरूप सारखेंच चंचल आहे,. यावरून सर्व वृत्तींमध्ये ही दोन्ही भावंडेंच आहेत, असे वाटते. ४४३ श्मशानमापदं दैन्यं दृष्ट्वा को न विरज्यते ।
तद्वैराग्यं परं श्रेयः स्वतो यदभिजायते ॥ १।२८ स्मशानांत गेल्यानंतर किंवा आपत्ति आणि दैन्य प्राप्त झाल्यानंतर कोणाला वैराग्य उत्पन्न होत नाही ? परंतु असलें वैराग्य खरे नव्हे, स्वतः विचार करून जें वैराग्य उत्पन्न होते, तेच अत्यंत श्रेयस्कर होय. ४४४ श्रीमानजननिन्द्यश्च शूरश्चाप्यविकत्थनः ।
समदृष्टिः प्रभुश्चैव दुर्लभाः पुरुषास्त्रयः ॥ १।१३।११ लोकांच्या निंदेला पात्र न झालेला श्रीमंत, स्वतः प्रौढि न सांगणारा शूर, आणि सर्वत्र समदृष्टि असणारा राजा हे तीन पुरुष या जगांत दुर्लभ आहेत. ४४५ श्रुत्वा स्पृष्ट्वा च दृष्ट्वा च भुक्त्वा घ्रात्वा शुभाशुभम् ।
न हृष्यति ग्लायति यः स शान्त इति कथ्यते।।२।१३।८२ चांगल्या किंवा वाईट गोष्टी ऐकून, पाहून, तसेंच चांगल्या किंवा वाईट पदार्थांना स्पर्श करून, त्यांचा वास घेऊन, किंवा उपभोग घेऊन ज्याला हर्ष किंवा विषाद उत्पन्न होत नाही, त्यालाच शांत असे म्हणतात.
For Private And Personal Use Only