________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
६८
सार्थ श्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३४३ मौख्यं हि बन्धनमवेहि परं महात्मन् || ६।८९।३१ ( चूडाला शिखिध्वजाला म्हणते ) मूर्खपणा हें मोठें बंधन आहे असें समज.
३४४ य एव यत्नः क्रियते बाह्यार्थोपार्जने जनैः ।
स एव यत्नः कर्तव्यः पूर्वं प्रज्ञाविवर्धने || ५ | १२|२६ द्रव्यादि बाह्य पदार्थ मिळविण्यासाठीं मनुष्य जसा प्रयत्न करतो तसा जोराचा प्रयत्न प्रथमतः बुद्धि वाढविण्यासाठीं करावा. ३४५ यत्कृतं मनसा तात तत्कृतं विद्धि राघव ।
यत्यक्तं मनसा तावत्तत्त्यक्तं विद्धि चानघ ॥ ३।११०।१४ ( श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे निष्पाप रामा, जें मनानें केलें तेंच खरोखर केलें असें जाण. आणि ज्याचा मनानें त्याग केला त्याचाच त्याग केला असें समज.
३४६ यत्नवद्भिर्दृढाभ्यासैः प्रज्ञोत्साहसमन्वितैः ।
मेरवोऽपि निगीर्यन्ते कैव प्राक्पौरुषे कथा || २|४|१८
बुद्धिमान, उत्साही, उद्योगी पुरुषांनीं प्रयत्नपूर्वक दृढ अभ्यास केला असतां, त्यांना मेरुपर्वत सुद्धां गडप करून टाकतां येतो, मग पूर्वजन्मांतील पौरुष नाहींसें करतां येईल, यांत नवल काय ? ३४७ यत्नेनापि पुनर्बद्धं केन वृन्तच्युतं फलम् ॥ ७/१२५।३२ देठापासून गळलेले फळ पुन्हां कोणीतरी प्रयत्न करून देठाला पूर्वीप्रमाणें चिकटवू शकेल काय ? ३४८ यत्सुखं दुःखमेवाहुः क्षणनाशानुभूतिभिः ।
अकृत्रिममनाद्यन्तं यत्सुखं तत्सुखं विदुः || ७|६८ ३१
क्षणांत नाश पावण्याचा अनुभव येत असल्यामुळें ज्ञाते लोक विषयसुखाला दुःखच असें म्हणतात. आणि जें स्वाभाविक, अनादि, अनंत असें आत्मस्वरूपाचें सुख त्यालाच खरें सुख म्हणतात.
For Private And Personal Use Only