________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२८१ परोपकारकारिण्या परार्तिपरितप्तया।
बुद्ध एव सुखी मन्ये स्वात्मशीतलया धिया॥२६॥३९ (राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) परोपकार करणारी, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित होणारी व आत्मज्ञानाने तृप्त झालेली अशी बुद्धि ज्या ज्ञानी पुरुषाची आहे, तो खरा सुखी असे मला वाटते. २८२ पापस्य हि भयाल्लोको राम धर्मे प्रवर्तते ॥ ५/७५/३७
(श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे रामा, पापाच्या भयानेच लोकांची धर्माकडे प्रवृत्ति होत असते. २८३ पीताशेषविवेकाम्बुः शरीराम्भोधिवाडवः।
न निर्दहति यं कोपस्तं मृत्युने जिघांसति ॥ ६।२३।९ ज्याने विवेकरूपी सर्व उदक पिऊन टाकले आहे, असा शरीररूपी समुद्रातील क्रोधरूपी वडवाग्नि ज्याला जाळीत नाही, त्याला ठार मारण्याची इच्छा मृत्यु करीत नाही. २८४ पुण्यानि यान्ति वैफल्यं
वैफल्यं यान्ति मातरः । भाग्यानि यान्ति वैफल्यं
नाभ्यासस्तु कदाचन ॥७६७।३२ 'मी अमुक पुण्य केले' असें आपल्या तोंडाने दुसन्यास सांगितले असतां तें पुण्य व्यर्थ जाते. प्रसंगी मातेचा व ऐश्वर्याचाही उपयोग होत नाही, परंतु अभ्यास हा कधीही फुकट जात नाही. २८५ पुत्रमित्रकलत्रादि तृष्णया नित्यकृष्टया ।
खगेष्विव किरात्येदं जालं लोकेषु रच्यते ॥१११७४१५ भिल्लीण पक्ष्यांना पकडण्याकरितां जाळे तयार करते, त्याप्रमाणे मनुष्यांना नेहमी आकर्षण करणारी तृष्णा ही पुत्र, मित्र, स्त्री इत्यादिकांचे जाळे तयार करते.
For Private And Personal Use Only