SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 37
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीमहाभारत सुभाषितानि १५६ आदावेव मनुष्येण वर्तितव्यं यथाक्षमम् । यथा नातीतमर्थं वै पश्चात्तापेन युज्यते ।। ११।११३५ आधीपासूनच मनुष्यानें योग्य रीतीनें वागावें. म्हणजे गोष्ट हातची गेल्यावर त्याकरितां पश्चात्ताप करण्याची पाळी येणार नाहीं. १५७ आदित्यचन्द्रावनिलानलौ च द्यौर्भूमिरापो हृदयं यम । अहश्व रात्रिश्व उभे च संध्ये २७ धर्मश्च जानाति नरस्य वृत्तम् ||१|७४|३० सूर्य, चंद्र, वायु, अग्नि, आकाश, पृथ्वी, जल, तसेंच आपले अंतःकरण, यम, दिवस, रात्र, सकाळ संध्याकाळचा संधिप्रकाश आणि धर्म इतक्यांना मनुष्याचें बरेवाईट कृत्य समजते. १५८ आनृशंस्यं परो धर्मः परमार्थाच्च मे मतम् || ३ | ३१३।१२९ [ युधिष्ठिर यक्षाला म्हणतो ] क्रौर्य नसणे म्हणजे दयाळुपणा हाच श्रेष्ठ धर्म होय. असें माझें निश्चित मत आहे. १५९ आपत्सु विहितं स्तैन्यं विशिष्टं च महीयसः । विप्रेण प्राणरक्षार्थं कर्तव्यमिति निश्चयः ।। १२।१४१।३९ आपत्काली एकवेळ पोट भरेल इतक्या धान्याचें चौर्य शास्त्रविहित आहे. त्यांतूनहि विशेषतः मोठ्यांना. कारण ते प्राणान्तींही शास्त्राचें उल्लंघन न करणारे असल्यामुळे प्राणास. मुकतील. म्हणून ब्राह्मणानेही प्राणरक्षणार्थ तें करावें असा सिद्धांत आहे. १६० आपदर्थे धनं रक्षेद्दारान् रक्षेद्धनैरपि । आत्मानं सततं रक्षेद्दारैरपि धनैरपि || ५|३७|१८ संकटप्रसंगी उपयोग व्हावा म्हणून धनाचें रक्षण करावें. धनाचा त्याग करूनसुद्धां स्वस्त्रीचें रक्षण करावें. आणि धनाचा व स्त्रीचा त्याग करून देखील नेहमी स्वतःचें रक्षण करावें. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy