SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 362
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि १९३ त्यजत्स्वात्मसुखं सौम्यं मनो विषयविद्रुतम् । अङ्कुशेनेव नागेन्द्रं विचारेण वशं नयेत् ॥४।२३५१ हत्तीला अंकुशाच्या योगानें कह्यांत ठेवतात, त्याप्रमाणे स्वात्मसुखाचा त्याग करून विषयसुखाच्या मागे धांव घेणाऱ्या मनाला विचाराच्या योगाने तान्यांत ठेवावे. १९४ त्यजन्त्युद्यममुधुक्ता न स्वकर्माणि केचन ॥ ३।२।५ उद्योगी पुरुष स्वकर्मापासून कधीही पराङ्मुख होत नाहीत. १९५ त्यागो न युक्त इह कर्मसु नापि रागः ॥ ५।५।५४ अवश्य प्राप्त कर्माचा त्याग करणे व त्याविषयी आसक्ति ठेवणे ही दोन्ही युक्त नव्हत. १९६ दासाः पुत्राः स्त्रियश्चैव बान्धवाः सुहृदस्तथा । हसन्त्युन्मत्तकमिव नरं वार्धककम्पितम् ॥ १।२२।६ उन्मत्त मनुष्याकडे पाहून लोक हसतात, त्याप्रमाणे म्हातारपणी मनुष्याचे शरीर कांपूं लागले म्हणजे त्याचे नोकर चाकर, मुलगे, बायका, बधु, आणि मित्र त्याच्याकडे पाहून हसू लागतात. १९७ दीनो वासनया लोकः कृतान्तेनापकृष्यते । रज्ज्वेव बालेन खगो विवशो भृशमुच्छ्रसन्॥४२७।३४ जाळ्यांत किंवा फासांत सांपडून पराधीन झालेल्या व घाबरलेल्या पक्ष्याला एका लहान पोर दोरी धरून सहज ओढते; त्याप्रमाणे वासनेच्या योगाने दीन झालेल्या मनुष्याला यम आपल्या फासांनी ओढतो. १९८ दीर्घसंसाररोगस्य विचारो हि महौषधम् ॥ २॥१४॥२ संसाररूपी दीर्घरोगावर विचार हे रामबाण औषध आहे. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy