________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
१७८ तपसैवं महोग्रेण यदुरापं तदाप्यते ॥ ३६।६८।१४ __ मिळविण्यास कठीण अशी कोणतीही वस्तु मोठ्या उग्रतपाने प्राप्त होते. १७९ तरङ्गं प्रतिबिम्बेन्दुं तडित्पुञ्ज नभोऽम्बुजम् ।
ग्रहीतुमास्थां बध्नामि नत्वायुषि हतस्थितौ ॥१।१४।७ (राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) पाण्यावरील लाटा, चंद्राचे प्रतिबिंब, विजेची चमक, आकाशांतील कमळे यांना पकडतां येईल. परंतु चंचल आयुष्यावर विश्वास ठेवता येणार नाही. १८० तर तारुण्यमस्तीदं यावत्ते तावदम्बुधेः।
ननु संसारनामोऽस्माद्बुद्धया नावा विशुद्धया ७१६२।१९ (श्रीवसिष्ठ रामाला सांगतात) तारुण्य आहे तोपर्यंतच 'शुद्धबुद्धि' या नौकेच्या योगाने संसारसागरांतून तरून जाण्याचा यत्न कर. १८१ तरन्ति मातङ्गघटातरङ्गं
रणाम्बुधिं ये मयि ते न शूराः । शूरास्त एवेह मनस्तरङ्गं
देहेन्द्रियाम्भोधिमिमं तरन्ति ॥ १।२७९ (राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) ज्या रणरूपी समुद्रामध्ये शेंकडों हत्तींचे कळप तरंगाप्रमाणे दिसत आहेत, असा समुद्र तरून जाणारे लोक खरे शूर, असें मी समजत नाही, तर खरे शूर योद्धे तेच की, जे मनोरूपी तरंगांनी युक्त असलेल्या देहेंद्रियरूपी समुद्रांतून सुरक्षितपणे तरून जातात. १८२ तरवोऽपि हि जीवन्ति जीवन्ति मृगपक्षिणः ।
स जीवति मनो यस्य मननेन न जीवति ॥ १।१४।११ जगांत वृक्ष किंवा पशुपक्षी जगतच आहेत; परंतु ते जगणे खरें नव्हे. तोच खरा जिवंत की, ज्याचे मन वासनाक्षयामुळे जिवंत नाही. किंवा तत्त्वबोधामुळे जो मनाला तुच्छ लेखतो.
For Private And Personal Use Only