SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 355
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थ श्री योगवासिष्ठसुभाषितानि १५८ जरासुधालेपसिते शरीरान्तःपुरान्तरे । अशक्तिरार्तिरापच्च तिष्ठन्ति सुखमङ्गनाः || १ |२२|३६ जरारूपी चुन्याचा लेप दिल्यामुळें शरीररूपी अंतःपुर फटफटीत दिसूं लागलें, म्हणजे अशक्तता, पीडा व आपत्ति ह्या स्त्रिया त्या अंतःपुरांत आनंदाने राहू लागतात. १५९ जलमेव यथाम्भोधिर्न तरङ्गादिकं पृथक् । ३३ आत्मैवेदं तथा सर्व न भूतोयादिकं पृथक् ॥ ५/७१।१४ समुद्र म्हणजे पाणीच असून लाटा पाण्याहून निराळ्या नसतात त्याप्रमाणें हें सर्व जग तत्त्वतः आत्माच असून पृथ्वी, उदक इत्यादि भूतें आत्म्याहून भिन्न नाहींत. १६० जले जलचरव्यूहान् सूक्ष्मान्स्थूलो निकृन्तति । ग्रासार्थं निर्दयो मत्स्यः कैवात्र परिदेवना ।। ५।१४।२० पाण्यांतील मोठा निर्दय मासा आपणापेक्षां लहान जलचर प्राण्यांना खाऊन टाकतो, या ठिकाणीं शोक तरी किती करणार ? ( प्रबलांकडून दुर्बलांना पीडा व्हावयाची असा या सृष्टींतील नियमच आहे. ) १६१ जाग्रत्येव सुषुप्तस्थः कुरु कर्माणि राघव । अन्तः सर्व परित्यागी बहिः कुरु यथागतम् || ६ | १२५/६ ( श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे राघवा, जागृतीमध्यें सुषुप्तीमध्यें असल्याप्रमाणें राहून कर्मे करीत जा. आंतून सर्वांचा परित्याग कर, पण बाहेर प्राप्त झालेला व्यवहार करण्यास चुकूं नकोस. १६२ जायते जीव्यते पश्चादवश्यं च विनश्यति || ४|४८|२५ उत्पन्न होऊन जगणें, हें जसें सृष्टींतील एक कार्य आहे, तसेंच शेवटी मरणें हेंही एक अवश्य कार्य होय. यो. वा. ३ For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy