________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
१०३ उदारगुणयुक्ता ये विहरन्तीह देहिनः ।
धरातलेन्दवः सङ्गादृशं शीतलयन्ति ते ॥३७७।३० जे उदार व गुणवान पुरुष या जगांत विहार करतात, ते आपल्या सहवासाने सर्व लोकांना शीतलता आणि आल्हाद देणारे पृथ्वीवरील दुसरे चंद्रच होत. १०४ उपदेशक्रमो राम व्यवस्थामात्रपालनम् ।
ज्ञप्तस्तु कारणं शुद्धा शिष्यप्रज्ञैव राघव ॥ ६१८३।१३ (श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे राघवा, उपदेश करणे हे केवळ शास्त्रीय व्यवस्थेचे परिपालन करणे आहे. पण ज्ञानाचे कारण केवळ शिष्याची शुद्ध बुद्धिच आहे. १०५ उभाभ्यामेव पक्षाभ्यां यथा खे पक्षिणां गतिः ।
तथैव ज्ञानकर्मभ्यां जायते परमं पदम् ॥ १।१७ पक्ष्यांना आकाशांत संचार करण्याला ज्याप्रमाणे दोन पंखांची गरज असते, त्याप्रमाणे कर्म आणि ज्ञान या दोन साधनांच्या योगाने मोक्षरूपी परमपदाची प्राप्ति होते. १०६ उह्यन्ते वारणा यत्र तत्रोर्णायुषु का कथा ॥७६८१३७
हत्तीसारखे मोठेमोठे प्राणीही ज्या प्रवाहांतून वाहत जातात, तेथे क्षुद्र मेंढ्यांची काय कथा ! १०७ ऊर्ध्वबाहुर्विरोम्येष न च कश्चिच्छृणोति तत् ।
असंकल्पः परं श्रेयः स किमन्तर्न भाव्यते ॥६॥१२६।९४' (श्रीवसिष्ठ म्हणतात ) मी हात वर करून मोठ्याने ओरडत आहे पण माझ्या आक्रोशाकडे कोणी लक्ष देत नाही. विषयसंकल्पाचा त्याग केल्याने मोक्षप्राप्ति होईल, ही गोष्ट लोक अंतःकरणांत कां ठसवून घेत नाहीत ?
For Private And Personal Use Only