________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
xmmm ९४ इंद्रियोत्तमरोगाणां भोगाशावर्जनादृते ।
नौषधानि न तीथोनि न च मन्त्राश्च शान्तये ॥७।६।४५ इंद्रियरूपी रोगावर भोगांची आशा सोडणे यावांचून दुसरें कोणतेही औषध नाही. तीर्थे, मंत्र इत्यादिकांच्या योगाने हा रोग नाहीसा होत नाही. ९५ इष्टवस्त्वर्थिनां तज्ज्ञसूपदिष्टेन कर्मणा ।
पौनःपुन्येन करणान्नेतरच्छरणं मुने ॥ ७६७४२३ (विद्याधरी श्रीवसिष्ठांना म्हणते) हे मुने, लौकिक शिल्प अथवा वैदिक विद्या इत्यादि फलांची इच्छा करणान्या विद्यार्थ्यांस त्या त्या विद्यांच्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे पुनः पुनः त्याचा अभ्यास करणे हेच श्रेयस्कर आहे. ९६ इहैव नरकव्याधेश्चिकित्सां न करोति यः।
गत्वा निरौषधं स्थानं सरुजः किं करिष्यति ॥७१०३१५१ येथे असतांनाच पुढच्या नरकव्याधीची चिकित्सा केली पाहिजे. औषध मिळणार नाही अशा ठिकाणी गेल्यावर रोगग्रस्त मनुष्य काय करणार? ९७ ईप्सितावेदनाख्यात्तु मनःप्रशमनादृते ।
गुरूपदेशशास्त्रार्थमन्त्राद्या युक्तयस्तृणम् ॥ ३॥१११।१४ इष्टवस्तूविषयीं वैराग्य उत्पन्न होऊन मन शांत झाल्याशिवाय गुरूपदेश, शास्त्रार्थ, मंत्र इत्यादि युक्त्या व्यर्थ होत. ९८ ईश्वरप्रेरितो गच्छेत्स्वर्ग नरकमेव वा । । स सदैव पराधीनः पशुरेव न संशयः॥ २।६।२७
केवळ ईश्वराने प्रेरणा केल्यामुळे मनुष्य स्वर्गाला किंवा नरकाला जातो, असें ज्याला वाटते, असा मनुष्य नेहमीं पराधीनच राहणार, व असला मनुष्य निःसंशय पशु होय.
For Private And Personal Use Only