SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 338
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ७६ आदावन्ते च यन्नास्ति कीदृशी तस्य सत्यता । आदावन्ते च यन्नित्यं तत्सत्यं नाम नेतरत् ॥ ५।५।९ जें पूर्वकाली आणि उत्तरकाली नाही ते मधल्या कालांत तरी सत्य कसे असणार ? जें सर्वदा (तिन्हीकालांत) असते, तें वास्तविक सत्य होय, तद्यतिरिक्त सत्य असणे शक्य नाही. ७७ आदावेव हि नोत्पन्नं यत्तस्येहास्तिता कुतः। __कुतो मरौ जलसरिद्वितीयेन्दौ कुतो ग्रहः ॥ ३७४२ जें आरंभी उत्पन्नच झालेले नाही त्याला अस्तित्व कोठून असणार ? रखरखीत वाळवंटांत भासणारी नदी आणि दृष्टिदोषामुळे. आकाशांत भासणारा दुसरा चंद्र यांना अस्तित्व कसे असेल ? ७८ आदौ शमदमप्रायैर्गुणैः शिष्यं विशोधयेत् । पश्चात्सर्वमिदं ब्रह्म शुद्धस्त्वमिति बोधयेत् ॥ ४।३९।२३ शिष्याची बुद्धि प्रथम शमदमादि गुणांनी चांगली शुद्ध करावी, नंतर ' हे सर्व जग ब्रह्म आहे' आणि 'तूंहि शुद्ध ब्रह्मच आहेस' असा उपदेश करावा. ७९ आनन्दायैव भूतानि यतन्ते यानि कानिचित्।६।१०८।२० कोणताहि प्राणी सुखासाठींच यत्न करीत असतो. ८० आपतन्ति प्रतिपदं यथाकालं दहन्ति च । दुःखचिन्ता नरं मूढं तृणमग्निशिखा इव ॥ २॥११॥४० अग्नीची ज्योत गवताला जाळून टाकते त्याप्रमाणे दुःख आणि चिंता यांचे तडाखे मूढ मनुष्याला पावलोपावली सहन करावे लागतात; व त्याच्या आंगाचा नेहमी दाह करतात. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy