________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१० सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ४६ अप्राप्तकारिणं भूपं रोधयन्ति च वै प्रजाः ॥ ६८४।२७
प्रजा अयोग्य कार्य करणाऱ्या राजाचे निवारण करतात. ४७ अबन्धुर्वन्धुतामेति नैकट्याभ्यासयोगतः ।
यात्यनभ्यासतो दूरात्स्नेहो बन्धुषु तानवम् ।। ७।६७।२९ नेहमींच्या सहवासामुळे जो आप्त नसतो तोही आप्त होतो, आणि प्रत्यक्ष बंधु असून तो निरंतर दूर राहिल्यास स्नेहसंबंध कमी होऊन परक्याप्रमाणे भासतो. ४८ अभ्यासभास्वति तपत्यवनौ वने च
वीरस्य सिध्यति न यन्न तदस्ति किंचित् । अभ्यासतो भुवि भयान्यभयीभवन्ति
सर्वासु पर्वतगुहास्वपि निर्जनासु ॥ ७६७।४५ जितेंद्रिय वीर पुरुषाचा अभ्याससूर्य प्रकाशमान होत असतांना भूमि, जल, अंतरिक्ष इत्यादिकांतील कोणतीही वस्तू त्याला प्राप्त करून घेता येते. इतकेच नव्हे कोणत्याही निर्जन पर्वतगुहेतील व्याघ्रसादि भयंकर प्राणीहि त्याला भय उत्पन्न करूं शकत नाहीत. ४९ अभ्यासेन कटु द्रव्यं भवत्यभिमतं मुने ।
अन्यसै रोचते निम्बस्त्वन्यस्मै मधु रोचते॥७६७।२८ (विद्याधरी श्रीवसिष्ठांना म्हणते) हे मुने, अभ्यासाने कडू पदार्थही गोड वाटू लागतो. एखाद्याला मध आवडतो, तर एखाद्याला अभ्यासामुळे कडू लिंबच आवडतो.
For Private And Personal Use Only