________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
५ अज्ञस्यार्धप्रबुद्धस्य सर्वं ब्रह्मेति यो वदेत् ।
महानरकजालेषु स तेन विनियोजितः ॥ ४॥३९।२४ अगदी अज्ञ असलेल्या व अर्धवट ज्ञान झालेल्या शिष्याला 'हे सर्व ब्रह्म आहे' असा बोध जो गुरु करितो तो त्या शिष्याला महानरकांतच लोटतो.
६ अज्ञानमपि नास्त्येव प्रेक्षितं यन्न लभ्यते । - विचारिणा दीपवता स्वरूपं तमसो यथा ॥ ७५७।५
ज्याप्रमाणे दिवा घेऊन अंधकाराचा शोध करणाऱ्याला अंधकार कधीहि दिसावयाचा नाही, त्याप्रमाणे विचारपूर्वक पाहणारास अज्ञान देखील नाही, असे दिसून येईल. ७ अज्ञोऽपि तज्ज्ञतामेति ___ शनैः शैलोऽपि चूर्ण्यते । बाणोऽप्येति महालक्ष्यं
पश्याभ्यासविजृम्भितम् ॥७६७।२६ (विद्याधरी वसिष्ठांना म्हणते) अभ्यासाचा म्हणजे पुनः पुनः एखादी गोष्ट केल्याचा परिणाम पहा. या अभ्यासाने अज्ञ देखील तज्ज्ञ होतो, हळूहळू पर्वताचेंहि चूर्ण अभ्यासामुळे होते, आणि अचेतन असलेला बाण देखील धनुर्धराच्या अभ्यासामुळेच सूक्ष्म लक्ष्याचा वेध करू शकतो. ८ अत उक्तं मया राम यदि शुद्धे हि चेतसि ।
उपदेशः प्रसरति तैलबिन्दुरिवाम्भसि ॥७१६४ श्रीवसिष्ठ म्हणतात-पाण्यामध्ये पडलेला तेलाचा थेंब जसा सहज पसरतो, तसा शुद्ध अन्तःकरणाच्या शिष्याला केलेला उपदेश तत्काळ ठसतो.
For Private And Personal Use Only