________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
प्रस्तावना
श्रीयोगवासिष्ठ हा वेदान्ताचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. वसिष्ठ महर्षीनी रामाला केलेला उपदेश आद्य कवि वाल्मीकि यांनी आपल्या प्रासादिक वाणीने यामध्ये वर्णिला आहे. या ग्रंथाची मुख्य प्रकरणे ६ असून श्लोकसंख्या ३२ हजार आहे. यांतील निवडक ५०८ संस्कृत सुभाषितवचनें प्रस्तुत पुस्तकांत घेतली
आहेत आणि वचनांच्याखाली मराठी भाषान्तर दिले आहे. वचनें वर्णक्रमाने दिली असून शेवटी मुख्य विषयांची सूची जोडिली आहे. वचनांच्या डावीकडे क्रमांक घातले आहेत आणि उजवीकडे स्थलनिर्देश केला आहे. स्थलनिर्देशांतील डावीकडून पहिला अंक प्रकरणाचा, दुसरा सर्गाचा व तिसरा श्लोकाचा समजावा. ६ व्या निर्वाण प्रकरणाच्या उत्तरार्धाबद्दल ७ हा अंक घातला आहे. सूचीमध्ये विषयापुढील अंक हे वचनांचे क्रमांक आहेत.
हे सुभाषितवचनांचे पुस्तक सर्वांच्या वाचनात येवो, अशी श्रीरामप्रभूची प्रार्थना करून प्रस्तावना संपवितों. श्री विष्णु विनायक परांजपे
श्रीरामनवमी, शके १८५१६ राहणार पेण, जिल्हा कुलाबा.
For Private And Personal Use Only