________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ४७८ सर्वथा सुकरं मित्रं दुष्करं प्रतिपालनम् ।
अनित्यत्वात्तु चित्तानां प्रीतिरल्पेऽपि भिद्यते॥४॥३२७ (सुग्रीव मंत्र्यांना म्हणतो. ) मित्र संपादन करणे सुलभ आहे, परंतु त्याच्याशी सख्य कायम राखणे मात्र सर्व प्रकारे कठीण आहे. कारण,अंतःकरणे स्थिर नसल्यामुळे शचूंनी अल्पस्वल्प जरी मित्राच्या कानांत सांगितले, तरी सुद्धा उभयतांतील प्रेमाला व्यत्यय येतो. ४७९ सर्वदा सर्वभूतानां नास्ति मृत्युरलक्षणः । __ तव तद्वदयं मृत्युमैथिलीकृतलक्षणः ॥६।११।२९ (मंदोदरी रावणाला उद्देशून म्हणते.) सर्व प्राण्यांना सर्वकाळी निमित्तावांचून मृत्यु नाही, त्याप्रमाणे तुला हा आलेला मृत्यु सीतेच्या निमित्ताने आहे. ४८० सर्वे क्षयान्ता निचयाः पतनान्ताः समुच्छ्रयाः।
संयोगा विप्रयोगान्ता मरणान्तं च जीवितम्।।७५२।११ तस्मात्पुत्रेषु दारेषु मित्रेषु च धनेषु च ।
नातिप्रसङ्गः कर्तव्यो विप्रयोगो हि तैध्रुवम् ॥ ७॥५२।१२ सर्व ऐश्वर्याचा शेवट नाशांत होतो, उच्चत्वाचा शेवट पतनांत होतो, संयोगाचा शेवट वियोगांत होतो, आणि जीविताचा शेवट मरणांत होतो. म्हणून पुत्र, स्त्री, मित्र, धनसंपत्ति यांच्या ठिकाणी अतिशय आसक्ति कधीं करूं नये. कारण, त्यांचा वियोग निःसंशय व्हावयाचाच आहे. ४८१ सर्वे चण्डस्य बिभ्यति ॥ ६२१ जो अत्यंत क्रुद्ध असतो, त्याला सर्व भितात.
For Private And Personal Use Only