SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 28
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ९९ अर्धं भार्या मनुष्यस्य भार्या श्रेष्ठतमः सखा । भायों मूलं त्रिवर्गस्य भार्या मूलं तरिष्यतः ॥११७४|४१ स्त्री से पुरुषाचे अर्धे आंगच होय. स्त्री हाच पुरुषाचा सर्वोत्तम मित्र होय. (धर्म, अर्थ व काम या ) तीनहि पुरुषार्थाचें मूळ स्त्रीच आहे. संसार तरून जाण्याची इच्छा करणाऱ्याचे मुख्य साधन स्त्रीच. १०० अलातं तिन्दुकस्येव मुहूर्तमपि हि ज्वल । मा तुषाग्निरिवानर्चिधूमायस्व जिजीविषुः ॥ ५।१३३।१४ (विदुला माता संजयास म्हणते) टेंभुरणीच्या लाकडाच्या कोलतीप्रमाणे थोडा वेळ का होईना, पण चमकून जा. केवळ जिवाची आशा धरून ज्वाला न निघणाऱ्या कोंड्याच्या अग्नीसारखा नुसता धुमसत राहूं नको. १०१ अल्पोऽपि ह्यरिरत्यर्थ वर्धमानः पराक्रमः। वल्मीको मूलज इव ग्रसते वृक्षमन्तिकात् । २।५५।१७ शत्रु क्षुद्र असला तरी तो आपल्या पराक्रमाने प्रबल होत जाऊन, बुंध्याशी असलेले वारूळ जसें अखेर झाडाला खाऊन टाकतें त्याप्रमाणे, आपल्या प्रतिपक्ष्याचा नाश करतो. १०२ अवज्ञानं हि लोकेस्मिन्मरणादपि गर्हितम् ॥ ३।२८।१२ या जगांत मानखंडना होणे हे मरणापेक्षांहि दुःखदायक आहे. १०३ अविद्वांसमलं लोके विद्वांसमपि वा पुनः । नयन्ति ह्यपथं नार्यः कामक्रोधवशानुगम् ॥ १३॥४८३७ जगांत कोणी विद्वान् असो किंवा अविद्वान् असो, तो कामक्रोधांच्या तडाक्यांत सांपडला की स्त्रिया त्याला कुमार्गाला नेतात. १०४ अविश्वासो नरेन्द्राणां गुह्यं परममुच्यते ॥ १२॥८५।३४ कोणाचाहि विश्वास न धरणे हे राजे लोकांचे एक मोठे रहस्य आहे. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy