________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३८२ यदि ह्यकाले मरणं यदृच्छया
लभेत कश्चिद्गुरुदुःखकर्शितः। गताहमद्यैव परेतसंसदं
विना त्वया धेनुरिवात्मजेन वै ॥२।२०५३ ( कौसल्या रामाला म्हणते. ) अत्यंत दुःखपीडित मनुष्य स्वेच्छेनुरूप जर मरण पावेल, तर वत्सरहित धेनूप्रमाणे मीहि तुझ्या वियोगाने आजच यमसदनाला गेल्ये असत्यें. ३८३ यद्रव्यं बान्धवानां वा मित्राणां वा क्षये भवेत् ।
नाहं तत्प्रतिगृह्णीयां भक्ष्यान्विषकृतानिव ॥२।९७४ (राम लक्ष्मणाला म्हणतो.) बांधवांच्या व मित्रांच्या नाशाने प्राप्त होणारे द्रव्य विषमिश्रित भक्ष्य पदार्थाप्रमाणे मी स्वीकारणार नाही. ३८४ यद्विना भरतं त्वां च शत्रुघ्नं वापि मानद ।
भवेन्मम सुखं किंचिद्भस्म तत्कुरुतां शिखी ॥२।९७८ ( राम म्हणतो.) हे मान देणान्या ( लक्ष्मणा,) तुझा, भरताचा किंवा शत्रुघ्नाचा वियोग होऊन जें कांहीं सुख मला होणार असेल त्याचे अग्नि भस्म करून टाको. ३८५ यद्वृत्ताःसन्ति राजानस्तद्वृत्ताः सन्ति हि प्रजाः२।१०९।९
राजे ज्या वर्तनाचे असतात, त्याच वर्तनाच्या प्रजा असतात. ३८६ यमक्षयमनुप्राप्ता द्रक्ष्यन्ति न हि मानवाः॥२॥६४।६१
(दशरथ कौसल्येला म्हणतो. ) यमसदनाला निघालेल्या मानवांना काही दिसेनासें होतें. ३८७ यमिच्छेत्पुनरायातं नैनं दूरमनुव्रजेत् ॥ २।४०५०
(देशांतरी जाणान्याने ) पुनः सत्वर परत यावे, अशी इच्छा असल्यास त्याला फार दूरपर्यंत पोहोचविण्यास जाऊ नये.
For Private And Personal Use Only