________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ७३ ३५० मरणान्तानि वैराणि निवृत्तं नः प्रयोजनम् । ___क्रियतामस्य संस्कारो ममाप्येष यथा तव ॥६।१०९।२६
(रावणाचें और्वदेहिक कर्म करण्याविषयी अनुज्ञा देतांना राम विभीषणाला सांगतो.) वैराचा अंत मरणाबरोबर होत असल्यामुळे, ते आमचें वैराचे प्रयोजन आतां संपलें. (आपला कार्यभाग उरकला आहे.) तर जसा तो तुझा आप्त, तसाच माझाही असल्यामुळे, त्याचा संस्कार कर. ३५१ महतेवाम्बुवेगेन भिन्नः सेतुर्जलागमे ।
दुरावरं त्वदन्येन राज्यखण्डमिदं महत् ॥ २।१०५।५ (भरत रामाला म्हणतो.) ज्याप्रमाणे पर्जन्यकाली जलवेगाने मोडलेला पूल दुरुस्त करणे अत्यंत कठीण आहे, त्याप्रमाणे हे भरतखंड नांवाचे प्रचड राज्य तुझ्यावांचून इतरांस आवरतां येणें कठीण आहे. ३५२ महर्षयो धर्मतपोभिरामाः
कामानुकामाः प्रतिबद्धमोहाः । अयं प्रकृत्या चपलः कपिस्तु
कथं न सज्जेत सुखेषु राजा ॥ ४॥३३॥५७ ( कामासक्त झालेल्या सुग्रीवाबद्दल तारा लक्ष्मणाला म्हणते.) धर्मार्थ तपश्चर्या करून त्यांत रममाण होणारे असे महर्षिही कामातुर होऊन स्त्रियांविषयीं मोहित झाले आहेत, मग जातीनेच चंचल असलेला हा वानर, आणि त्यांतूनही राजा असतांना विषयसुखाविषयी कसा बरें आसक्त होणार नाही ?
For Private And Personal Use Only