________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२९४ परस्य वीर्य स्वबलं च बुद्धा
__ स्थानं क्षयं चैव तथैव वृद्धिम् । तथा स्वपक्षेऽप्यनुमृश्य बुद्धथा
वदेत्क्षमं स्वामिहितं स मन्त्री ॥ ६।१४।२२ जो पुरुष शत्रूचे आणि आपलें बल जाणतो, शत्रूच्या आणि आपल्या सैन्याची स्थिति, वृद्धि, आणि क्षय ह्यांचा बुद्धिपूर्वक विचार करितो, आणि स्वामीचे हित कशांत आहे ते योग्य रीतीने सांगतो, तोच खरा मंत्री होय. २९५ परस्वहरणे युक्तं परदाराभिमर्शकम् ।
त्याज्यमाहुर्दुरात्मानं वेश्म प्रज्वलितं यथा ॥६८७।२३ परद्रव्यापहारी आणि परस्त्रीहरणकर्ता असा जो दुरात्मा ते प्रज्वलित गृहाप्रमाणे त्याज्य होय. २९६ परस्वानां च हरणं परदाराभिमर्शनम् ।
सुहृदामतिशङ्का च त्रयो दोषाःक्षयावहाः॥ ६१८७।२४ परद्रव्य हरण करणे, परस्त्रीसमागम आणि मित्रांच्या ठिकाणी शंकित वृत्ति हे तीन दोष नाशकारक आहेत. २९७ पराक्रमोत्साहमतिप्रताप
सोशील्यमाधुर्यनयानयैश्च । गाम्भीर्यचातुर्यसुवीर्यधैर्यै
हनूमतः कोऽप्यधिकोऽस्ति लोके ॥ ७३६॥४३ पराकम, उत्साह, बुद्धि, प्रताप, सुशीलता मधुरवाणी, नीति व अनीति यांचे ज्ञान, गांभीर्य, चातुर्य, उत्कृष्टवीर्य, आणि धैर्य या गुणांनी जगतामध्ये हनुमानापेक्षां कोण बरें अधिक आहे ?
For Private And Personal Use Only