________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
wwwwwwwwwwwimmwwwmarwari
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ५९ २८४ न्यस्तदण्डा वयं राजन् जितक्रोधा जितेन्द्रियाः।
रक्षणीयास्त्वया शश्वद्गर्भभूतास्तपोधनाः॥ ३१॥२२ (महर्षि रामाला म्हणतात.) हे राजा, आम्ही क्रोधसंयमन व इंद्रियदमन करून प्राण्यांचा निग्रह करण्याचे सोडिले आहे. म्हणून माता ज्याप्रमाणे गर्भाचे रक्षण करिते, त्याप्रमाणे तुला आमचे रक्षण करणे अवश्य आहे. २८५ पतिर्हि देवता नार्याः पतिर्बन्धुः पतिर्गुरुः ।
प्राणैरपि प्रियं तस्माद्भर्तुः कार्य विशेषतः॥ ७४८।१८ पति ही स्त्रियांची देवता आहे. स्त्रियांचा बंधु आणि गुरुही तोच आहे. म्हणून भांचे प्रियकार्य प्राण खची घालूनही विशेषेकरून त्यांनी करावें. २८६ पतिशुश्रूषणानार्यास्तपो नान्यविधीयते ॥ २॥११८।९
पतिशुश्रूषेपलीकडे स्त्रीला दुसरे कोणतेही तप नाही. २८७ पद्ममातपसंतप्तं परिक्लिष्टमिवोत्पलम् । काञ्चनं रजसा ध्वस्तं क्लिष्टं चन्द्रमिवाम्बुदैः।।२।१०४।२५ मुखं ते प्रेक्ष्य मां शोको दहत्यग्निरिवाश्रयम् ।
भृशं मनसि वैदेहि व्यसनारणिसंभवः ॥ २१०४।२६ (कौसल्या म्हणते.)हे सीते, उन्हाने संतप्त झालेले पद्म, चुरडलेले रक्तकमल, धुळीने मलिन झालेले सुवर्ण, अथवा मेघाच्छादित चंद्र, यांप्रमाणे तुझें मुख पाहून (अरणीपासून उत्पन्न झालेला) अग्नि आश्रयभूत काष्ठांस दहन करितो, तसाच माझ्या अंत:करणांत दुःखरूप अरणीपासून उत्पन्न झालेला शोक मला दहन करीत आहे.
For Private And Personal Use Only