________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
५७
२७४ निरायुधानां क्रमतामसङ्गगतिपौरुषाः ।
दारा ह्युपहसिष्यन्ति स वै घातः सुजीवताम्॥६।६६२० (युद्धाचे वेळी पळत सुटणान्या वानरांना अंगद म्हणतो. ) तुमची गति व पराक्रम ही दोन्ही कोठेही कुंठित होणारी नसतांना आयुधांचा त्याग करून जर तुम्ही जाऊं लागला, तर तुमच्या बायकाही तुम्हांला हसतील आणि स्त्रियांनी उपहास करणे हा तर मानाने राहणाऱ्यांचा घातच होय. २७५ निरुत्साहस्य दीनस्य शोकपर्याकुलात्मनः।
सर्वार्था व्यवसीदन्ति व्यसनं चाधिगच्छति ॥ ६॥२॥६ निरुत्साह, दीन, शोकानें व्याकुल, अशा पुरुषांची सर्व कार्ये नाश पावतात, आणि त्यांजवर संकट कोसळतात. २७६ नीत्या सुनीतया राजा धर्म रक्षति रक्षिता ।। यदान पालयेद्राजा क्षिप्रं नश्यन्ति वै प्रजाः॥७५९ प्र. २।५
प्रजेचे रक्षण करणारा राजा उत्कृष्ट चालविलेल्या नीतीने धर्माचें रक्षण करीत असतो. राजा जेव्हां धर्माचे रक्षण करीनासा होतो तेव्हां प्रजेचा सत्वर नाश होतो. २७७ नृशंसमनृशंसं वा प्रजारक्षणकारणात् ।
पातकं वा सदोषं वा कर्तव्यं रक्षता सदा ॥ १।२५।१८ ज्यास प्रजारक्षण करावयाचे आहे, त्याला त्या रक्षणाकरितां क्वचित् प्रसंगी थोडेंसें क्रौर्याचे किंवा किंचित् पातक, अगर कांहीं सदोष कर्म करणे भाग पडले, तरी त्याने तें करावें. २७८ नेयं मम मही सौम्य दुर्लभा सागराम्बरा ।
न हीच्छेयमधर्मेण शक्रत्वमपि लक्ष्मण ॥ २९७७ (राम म्हणतो) हे सौम्य लक्ष्मणा, ही सागररूप वस्त्र परिधान केलेली पृथ्वी मला दुर्लभ आहे, असें नाही. तथापि मी तिची इच्छा करीत नाही. अधर्माने इंद्रपद मिळाले, तरी त्याची मी इच्छा करीत नाही.
For Private And Personal Use Only