________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२६३ नात्र कश्चिद्यथाभावं प्राणी समतिवर्तते ।
तेन तस्मिन्न सामर्थ्य प्रेतस्यास्त्यनुशोचतः २।१०५।२८ ह्या लोकी कोणीही प्राणी जन्ममरणांचे उल्लंघन करू शकत नाही. (असें आहे तरी तो मृतास उद्देशून शोक करितो.) वस्तुतः ह्या शोक करणान्याच्या आंगांत स्वजनावर येणारा मृत्यु टाळण्याचं सामर्थ्य नसते. २६४ नाददानं शराघोरान्विमुञ्चन्तं महाबलम् ।
न कार्मुकं विकर्षन्तं रामं पश्यामि संयुगे ॥ ३॥३४७ (शूर्पणखा रामाची हकीकत रावणाला सांगते ) हा महाबलवान राम (भात्यांतून ) घोर बाण केव्हां काढितो, केव्हां शत्रूवर सोडितो, तसेंच रणांगणावर धनुष्य केन्हां आकर्षण करितो, हे मला काहीच कळत नाही. २६५ नाराजके जनपदे तूद्यानानि समागताः ।
सायाह्ने क्रीडितुं यान्ति कुमार्यों हेमभूषिताः।।२।६७।१७ अराजक देशामध्ये सुवर्णभूषणांनी भूषित झालेल्या कुमारिका एकत्र जुळून सायंकाळी बागांतून क्रीडा करण्यास जात नाहीत. २६६ नाराजके जनपदे धनवन्तः सुरक्षिताः ।
शेरते विवृतद्वाराः कृषिगोरक्षजीविनः ॥२॥६७१८ राजहीन देशांत धनवान लोक सुरक्षित नसतात. कृषि करणारे गोरक्षण करणारे लोकही दरवाजे उघडे टाकून निजूं शकत नाहीत. २६७ नाराजके जनपदे प्रहष्टनटनर्तकाः।
उत्सवाश्च समाजाश्च वर्धन्ते राष्ट्रवर्धनाः ॥२।६७।१५ अराजक देशांत आनंदित नट व सूत्रधार ज्यामध्ये आहेत असे देवादिकांचे उत्सव व राष्ट्रोन्नतीला कारण होणारे समाज वृद्धिंगत होत नाहीत.
For Private And Personal Use Only