________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
ANNA
२५१ न हि धर्माभिरक्तानां लोके किंचन दुर्लभम् ॥७।१०।३३
जगांत धर्माच्या ठिकाणीं अनुरक्त असणाऱ्यांना कांहींच दुर्लभ
नाही.
२५२ न हि प्रकृष्टाःप्रेष्यन्ते प्रेष्यन्ते हीतरे जनाः॥५।३९।३९
(कार्याविषयों योजना करितांना) कनिष्ठ श्रेष्ठांना प्रेरणा करीत नसून श्रेष्ठच कनिष्ठांना प्रेरणा करितात. २५३ न हि प्रतिज्ञां कुर्वन्ति वितथा सत्यवादिनः ।
लक्षणं हि महत्त्वस्य प्रतिज्ञापरिपालनम् ॥६१०११५१ सत्यवादी लोक आपली प्रतिज्ञा कधीही खोटी करीत नसतात. प्रतिज्ञेचे परिपालन करणे हेच मोठेपणाचे लक्षण होय. २५४ न हि प्रेषयिता तात स्वामी प्रेष्यःकथंचन ॥४।६५।२२
(जांबवान् अंगदाला म्हणतो) बाबारे, जो प्रभु इतरांस (दूत म्हणून ) पाठविणारा, तो दूतांनी पाठविण्यास योग्य-प्रेष्य-कदापि होणार नाही. २५५ न ह्यतो धर्मचरणं किंचिदस्ति महत्तरम् । ___ यथा पितरि शुश्रूषा तस्य वा वचनक्रिया ॥२।१९।२२
( राम कैकेयीला म्हणतो) पित्याची शुश्रूषा करणे, अथवा त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे यापेक्षा कोणतेही धर्माचरण श्रेष्ठ नाही. २५६ न ह्यनिष्टोऽनुशास्यते ॥ ३।१०।२०
जो अप्रिय असेल त्याला कोणी हिताचा उपदेश करीत नसतो. २५७ न ह्यबुद्धिं गतो राजा सर्वभूतानि शास्ति हि ॥४।२।१८
बुद्धिभ्रष्ट झालेला राजा सर्व प्रजांवर अंमल चालविण्यास समर्थ होत नाही.
For Private And Personal Use Only