________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि २३२ न वाक्यमात्रेण भवान्प्रधानो । ... न कत्थनात्सत्पुरुषा भवन्ति ।। ६१७१।५९
(लक्ष्मण अतिकाय राक्षसाला म्हणतो) केवळ बडबड करण्याने तूं श्रेष्ठ होत नाहींस आणि फुशारक्या मारण्याने कोणी सत्पुरुषही होत नाहीत. २३३ न विषादे मनः कार्य विषादो दोषवत्तरः ।
विषादो हन्ति पुरुषं बालं क्रुद्ध इवोरगः ॥ ४।६४।९ (समुद्र पाहून खिन्न झालेल्या वानरांना धीर देऊन अंगद म्हणतो) तुम्ही मनामध्ये खेद करूं नका, खेद हा फार वाईट आहे. कारण कुद्ध झालेला सर्प ज्याप्रमाणे बालकाचा घात करतो, त्याप्रमाणे खेद हा मनुष्याचा घात करितो. २३४ न शक्तस्त्वं बलाद्धर्तुं वैदेहीं मम पश्यतः ।
हेतुभिायसंयुक्तैर्बुवां वेदश्रुतीमिव ॥ ३।५०।२२ ( जटायु रावणाला म्हणतो ) ज्याप्रमाणे न्याययुक्त हेतूंनी (प्रमाणांनी) सनातन वेदश्रुतीस अन्यथा करणे शक्य नाही, (मीमांसकांपुढे सनातन वेदश्रुतीला हेत्वाभासांच्या योगानें भलतीकडे नेण्यास ज्याप्रमाणे शास्त्री समर्थ होत नाही ) त्याप्रमाणे तूं माझ्या समक्ष बलात्काराने सीतेला हरण करण्याविषयी समर्थ होणार नाहींस. २३५ न शेकुः समवस्थातुं निहते वाहिनीपतौ।
सेतुबन्धं समासाद्य विशीर्ण सलिलं यथा ॥६।५८/५९ (प्रहस्त सेनापतीचा वध झाल्यावर राक्षसांची झालेली स्थिति ) फुटलेल्या बंधायापाशी येऊन पोचलेले पाणी ज्याप्रमाणे स्थिर राहण्यास समर्थ होत नाही, त्याप्रमाणे सेनापतीचा वध झाल्यावर ते राक्षस समरांगणामध्ये उभे राहण्यास समर्थ झाले नाहीत.
रा.सु. ४
For Private And Personal Use Only