________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
१८० दैवतं हि पतिः स्त्रियाः ।। ७९५।१०
स्त्रीचे दैवत म्हणजे पति होय. १८१ दैवं पुरुषकारेण यः समर्थः प्रबाधितुम् ।
न देवेन विपन्नार्थः पुरुषः सोऽवसीदति ॥ २।२३।१८ जो पुरुष आपल्या पराक्रमाने देवाचा निरास करण्यास समर्थ असतो, त्याचा दैवाने कार्यनाश झाला, तरी तो खचून जात नाही. १८२ द्विधा भज्येयमप्येवं न नमेयं तु कस्यचित् ।
एष मे सहजो दोषः स्वभावो दुरतिक्रमः॥६॥३६।११ (रावण माल्यवान राक्षसाला म्हणतो) प्रसंग पडल्यास माझ्या ( कळकाप्रमाणे ) दोन चिरफळ्याही होऊन जातील परंतु मी कोणाच्याही पुढे नम्र होणार नाही. हा माझा स्वाभाविक दोष आहे. परंतु स्वभाव पालटतां येणे अशक्य आहे. १८३ धनत्यागः सुखत्यागो देशत्यागोपि वानघ ।
वयस्यार्थे प्रवर्तन्ते स्नेहं दृष्ट्वा तथाविधम् ॥ ४।८९ ( सुग्रीव रामाला म्हणतो) हे निष्पापा, तशा प्रकारचा स्नेह पाहून, त्या स्नेह्याकरितां द्रव्याचा, सुखाचा किंवा देशाचाही त्याग केला जातो. १८४ धन्याः खलु महात्मानो ये बुद्धया कोपमुत्थितम् ।
निरुन्धन्ति महात्मानो दीप्तमग्निमिवाम्भसा ।।५।५५।३ प्रदीप्त झालेला अग्नि ज्याप्रमाणे उदकाने विझवून टाकितात, त्याप्रमाणे उत्पन्न झालेला क्रोध जे महात्मे आपल्या बुद्धीनें नाहींसा करतात ते खरोखर धन्य होत.
For Private And Personal Use Only